APMC Election छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत भाजप-शिंदे गटाच्या ताब्यात, महाविकास आघाडीला धक्का

  • Written By: Published:
APMC Election छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत भाजप-शिंदे गटाच्या ताब्यात, महाविकास आघाडीला धक्का

APMC Election 2023 Result : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) बाजार समितीमध्ये भाजप आणि शिंदे गटाला मोठं यश मिळालं आहे. महाविकासआघाडीला धक्का देत भाजप आणि शिंदे गटाने हे यश मिळवलं आहे.

छत्रपती संभाजीनगर बाजार समितीच्या एकूण 15 पैकी 11 जागा भाजप-शिंदे गटाने जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीला फक्त 4 जागांवर विजय मिळवता आला आहे.

सध्या राज्यभरात बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आज राज्यातील ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं. या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर आज यापैकी अनेक बाजार समित्यांची मतमोजणी होत आहे.

Maharashtra APMC Election Result LIVE updates : राज्याच्या कल कोणाकडे? कोण राखणार सत्ता

त्यामुळे आज मतदार कोणाला कौल मिळतोय, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आज राज्यातील 95 बाजार समित्यांची मतमोजणी होणार आहे. 147 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं. त्यातील 34 बाजार समित्यांची कालच मतमोजणी झाली आहे. त्याच बरोबर काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी आज मतमोजणी होत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube