माफी मागा अन्यथा… अजित पवारांवरील वक्तव्यावरून भिमराज सेनेचा हाकेंना इशारा
Bhimraj Sena ने अजित पवारांच्या विरोधातील वक्तव्याचा तीव्र निषेध केला लक्ष्मण हाकेंनी त्यांची माफी मागावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
Apologize Bhimraj Sena warns Lakshman Hake over statement on Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधातील अपमानास्पद वक्तव्यावर भिमराज सेनेने तीव्र निषेध केला आहे. तसेच त्यांनी लक्ष्मण हाकेंनी त्यांची माफी मागावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. भिमराज सेना प्रमुख राजूभाऊ थाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठं विधान केलं आहे.राजूभाऊ थाटे यांनी लक्ष्मण हाके नामक व्यक्तीवर समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा गंभीर आरोप केला आहे.
पुण्यात मोठा सायबर क्राईमचा बोलाबाला; कोट्यवधी लाटण्यासाठी रचायचा मोठा कट, बिंग फुटताच..
त्यांनी सांगितलं की लक्ष्मण हाके प्रसिद्धीसाठी वारंवार मराठा आणि मागासवर्गीय समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. भिमराज सेनेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सार्वजनिकरीत्या माफी मागण्याची मागणी केली आहे.जर पुढील दोन दिवसांत माफी न मागितली गेली, तर भिमराज सेनेचे कार्यकर्ते लक्ष्मण हाके यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाहीत असा इशारा दिला आहे. भिमसैनिकांनी स्पष्ट सांगितलं की लक्ष्मण हाके यांना त्यांच्या भाषेतच उत्तर दिलं जाईल आणि त्यासाठी ते स्वतः जबाबदार असतील.
पावसाळी आपत्कालीन प्लॅन तयार करा; मुंबईतील मान्सून पुर्व कामांचा आढावा घेत शेलारांच्या सूचना
राजूभाऊ थाटे यांनी अजित दादा पवार हे सर्व समाजांचे नेते असल्याचं सांगत त्यांना भावी मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची भावना व्यक्त केली.
जयभीमच्या घोषणांनी पत्रकार परिषद आणि आंदोलनाचा समारोप झाला.भिमराज सेनेच्या या भूमिकेमुळे राज्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
