Ashok Kharat : ५ गोळ्या अन् ५ नरबळी? खरातच्या ‘सैतानी’ फार्महाऊसमध्ये नक्की कुणाचे सांगाडे?
Ashok Kharat अंधश्रद्धेच्या नावाखाली वासनेचा आणि रक्ताचा खेळ खेळणाऱ्या या 'कॅप्टन'चा खरा चेहरा आता पोलिसांच्या कोठडीत ओरबाडला जाईल. पण...
Ashok Kharat Case Government Lawyer Big Claim In Argument : ज्याला तुम्ही अंकशास्त्राचा जाणकार समजत होता, जो स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणवून सुशिक्षित समाजाला गंडवत होता, तो अशोक खरात केवळ भोंदू नाही, तर एक रक्ताचा तहानलेला ‘हैवान’ असल्याचा संशय आता बळावलाय. नाशिक सत्र न्यायालयात सरकारी वकिलांनी जो पाढा वाचला, त्याने कायद्याचीही झोप उडाली आहे. ५ निष्पाप जीवांचा ‘नरबळी’, १०० हून अधिक महिलांचं लैंगिक शोषण आणि अघोरी कृत्यांचा असा भयानक खेळ… जो ऐकून तुमचं रक्त सळसळेल.
पाच नरबळींचा थरकाप उडवणारा दावा
मंगळवारी (दि.24) दुपारी ३:५० वाजता, २०० पोलिसांच्या गराड्यात जेव्हा तोंडावर काळा कपडा बांधलेल्या खरातला कोर्टात आणलं, तेव्हा वातावरण सुन्न होतं. पण खरी खळबळ उडाली ती सरकारी वकिलांच्या दाव्यानं! खरातच्या फार्म हाऊसवर जप्त केलेल्या पिस्तूलमधून ५ गोळ्या बेपत्ता आहेत. या ५ गोळ्या नक्की कुणाच्या छाताडात घुसल्या? अघोरी विद्येसाठी या नराधमाने ५ निष्पाप जीवांचा ‘रक्ताचा सडा’ घातला का? या संशयानं आता पोलिसांच्या तपासाची दिशाच बदलली आहे.
१०० अश्लील व्हिडीओ अन् ‘पापाचं कोठार’
खरातकडे सापडलेला पेनड्राईव्ह म्हणजे साक्षात ‘पापाचं कोठार’ निघालंय. ६७ वर्षांचा हा म्हातारा ३०-३० वर्षांच्या मुलींना पेढ्यातून गुंगीचं औषध देऊन त्यांचं लचके तोडत होता. १०० पेक्षा जास्त किळसवाणे व्हिडीओ या हैवानानं स्वतः शूट केलेत. वासनेचा हा नंगानाच आणि अघोरी विद्येचा हा प्रकार माणुसकीला काळिमा फासणारा आहे.
मुक्या प्राण्यांची शिकार अन् अघोरी खेळ
खरात नावाच्या या राक्षसाची भूक एवढ्यावरच थांबली नाही. तर, हा भोंदू भक्तांना वाटण्यासाठी ‘कस्तुरी’ वाटायचा. त्यामुळे खरातने नरबळींसह हरणांचीदेखील निर्घृण शिकार केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. एवढेच नव्हे तर, सापांचा खेळ आणि वाघांच्या अवयवांचा वापर करून ‘कॅप्टन’ खरात कसली सिद्धी मिळवत होता? हेदेखील तपासून समोर येईल.
पण, महाराष्ट्रात अघोरी कृत्य प्रतिबंधक कायदा असतानाही, एका १० वी नापास भोंदूने सुशिक्षित समाजाच्या डोळ्यादेखत हा हैदोस घातलाच कसा? हा फक्त एक गुन्हा नाही, तर आपल्या व्यवस्थेवर आणि समाजावर ओढलेला एक ‘सैतानी’ ओरखडा आहे. आता प्रतीक्षा आहे ती खरातच्या कोठडीतल्या त्या सत्याची जी ५ बेपत्ता गोळ्यांचं रहस्य उलगडेल. त्यामुळे आता पोलीस तपासात जमिनीखालून कुणाचे ‘सांगाडे’ बाहेर येणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.