Jitendra Awhad यांच्या रुपाने औरंगजेबाचे वारसदार, भाजपची खरमरीत टीका

  • Written By: Published:
Untitled Design (17)

“औरंगजेब जाऊन 300 वर्षे होऊन गेले. पण, आजही त्याचे विचार जोपासणारे त्याचे वारस जितेंद्र आव्हाड यांच्या रूपाने महाराष्ट्रात आहेत.” अशी टीका भाजपच्या सोशल मीडियावरून करण्यात आली आहे. याच ट्विटमध्ये पुढे अस म्हटल आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात औरंगजेबाचा वंशज आमदार आहे हे दुःखद आहे.

दोन दिवसापूर्वी पुण्यात एका कार्यक्रमात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच अफजल खान आणि शाहिस्तेखानाविषयी केलेल्या विधानावर आक्षेप घेतला जात आहे. भाजपाकडून आव्हाड यांचा निषेध व्यक्त केला जात असून काही ठिकाणी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनदेखील केले आहे. आपल्या विधानामुळे वाद निर्माण झाल्यामुळे आव्हाड यांनी याबाबत स्पष्टीकरणही दिले आहे. मात्र तरीदेखील भाजपाकडून आव्हाडांवर आक्रमकपणे टीका केली जात आहे.

नेमकं काय म्हणाले होते आव्हाड?

रामायणातून रावण काढून श्रीराम समजावून सांगा. महाभारतातून दुर्योधन, कर्ण काढून कृष्णअर्जुन समजावून सांगा. आदिलशाही आणि मुघलशाही काढून शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा.. इंग्रजांना बाजूला काढून भारतीय स्वतंत्र लढा समजावून सांगा असं ट्विट आव्हाड यांनी केलं होत.

शिंदे गट आणि भाजपाकडून आव्हाड यांच्यावर टीका केली जात असून त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. दरम्यान एका ट्वीटद्वारे आव्हाड यांनी केलेल्या विधानाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या विधानाचा पूर्ण व्हिडीओ पोस्ट करून तुम्ही बहुजन महापुरुषांची बदनामी करा. आम्ही त्याला उत्तर देऊ, असे आव्हाड म्हणाले आहेत.

Tags

follow us