Imtiaz Jaleel : टीसीएस धर्मांतर प्रकरणात इम्तियाज जलील यांना जामीन मंजूर
Imtiaz Jaleel : नाशिक शहरातील टीसीएस धर्मांतर प्रकरणात एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी जामीन मंजूर झाला आहे
Imtiaz Jaleel : नाशिक शहरातील टीसीएस धर्मांतर प्रकरणात एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी जामीन मंजूर झाला आहे. 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आले आहे. टीसीएस धर्मांतर आणि अत्याचारप्रकरणी जलीलांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.
तर आता 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना नाशिक न्यायालयाकडून (Imtiaz Jaleel) जामीन मिळाला आहे. जामीन मिळाल्यानंतर माझा न्यायालयावर विश्वास असल्याची प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
अजित पवारांचा 85 टक्के प्रवास VSR कंपनीच्या विमानातून ; महत्त्वाचा डेटा समोर
प्रकरण काय?
नाशिकमधील (Nashik) टीसीएस (TCS) कार्यालयातील कथिल लैंगिक छळ आणि धर्मांतराच्या प्रयत्नाच्या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर एसआयटीची (SIT) स्थापना करण्यात आली होती. एसआयटीकडून या प्रकरणात निदा खानसह (Nida Khan) सात आरोपींना अटक करण्यात आली होती. तसेच एसआयटीकडून या प्रकरणात दीड हजारांहून अधिक पानांचे दोषारोपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. त्यात 18 साक्षीदारांचे जबाब आणि विविध पुरावे सादर करण्यात आले होते.
वेलिंग्टन टेस्ट, पहिल्या दिवशी न्यूझीलंडचे वर्चस्व ; हेन्नी निकोल्सची शानदार फलंदाजी –