सांगली-सातारामध्ये विधानपरिषदेसाठी जयंत पाटील यांच्या निष्ठावंताला संधी, महायुतीचा उमेदवार कोण?

साताऱ्याची जागा महायुतीत जागा वाटपात भाजपला गेली आहे. या जागेवर भाजपकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

News Photo   2026 05 31T213056.393

स्थानिक स्वराज संस्था विधानपरिषदेच्या (Election) मतदारसंघातील 17 जागांसाठी निवडणूक होत असून महाविकास आघाडीने जागावाटपात आघाडी घेतली आहे. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवार जाहीर केले जात आहेत. सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडं आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील सातारा जिल्ह्यातील दोन माजी मंत्र्यांमध्ये उमेदवारीसाठी चुरस असताना याठिकाणी जयंत पाटील यांच्या सांगली जिल्ह्यातील विश्वासू नेत्याला उमेदवारी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाचे सांगली जिल्हा सरचिटणीस आणि जयंत पाटील यांचे निष्ठावंत बाळासाहेब पाटील सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सोमवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करणार आहेत. सातारा आणि सांगली स्थानिक स्वराज संस्था विधानपरिषद मतदारसंघासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून माजी मंत्री बाळासाहेब पाटील आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, आता जयंत पाटील यांचे निष्ठावंत बाळासाहेब पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार असून ते महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत.

विधान परिषद निवडणुकीत लंके यांची एंट्री., राष्ट्रवादीकडून उमेदवारी, आघाडीत बिघाडी? तनपुरे यांना पुन्हा शह?

या मतदारसंघातून सातारा जिल्ह्यातील माजी मंत्री बाळासाहेब पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नावांची चर्चा होती. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन माजी मंत्र्यांमध्ये उमेदवारीसाठी चुरस असताना व सांगली जिल्ह्यातून या मतदारसंघातून कोण इच्छुक असणार यासंदर्भातील नाव समोर आलं नव्हतं. दुसरीकडं रविवारी जयंत पाटील यांचे सांगली जिल्ह्यातील निष्ठावंत बाळासाहेब पाटील सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

महायुतीचा उमेदवाराची उत्सुकता

साताऱ्याची जागा महायुतीत जागा वाटपात भाजपला गेली आहे. या जागेवर भाजपकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. भाजपमध्ये साताऱ्यात सुनील काटकर, धैर्यशील कदम, मकरंद देशपांडे आणि शेखर गोरे यांची नावे आघाडीवर आहेत. तर सांगली जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते तानाजीराव पाटील यांनी विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तानाजीराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर तो कायम ठेवण्यासाठीच अर्ज केल्याचं म्हटले आहे. त्यामुळे सातारा सांगलीच्या जागेवर तानाजीराव पाटील यांचा अर्ज कायम राहणार की ते माघार घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

follow us