‘उद्धव ठाकरेंची भिती नाही पण, लिफ्टमध्ये अडकलो तर…’

‘उद्धव ठाकरेंची भिती नाही पण, लिफ्टमध्ये अडकलो तर…’

Bharat Gogavale : वाढदिवस हा वर्षातून एकदा प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचा क्षण येत असतो. आज उद्धव ठाकरे आणि रामदास कदमांचा देखील वाढदिवस आहे. रामदास कदमांना आम्ही सकाळी शुभेच्छा दिल्या. आता उद्धव ठाकरेंना देखील द्यायच्या आहेत मात्र ते स्विकारतील की नाही माहित नाही. कारण आमच्या मनात तस काही नाही. त्यांची प्रकृती ठिक राहो आणि उदंड आयुष्य लाभावे अशा वाढदिवसाच्या शुभेच्छा आम्ही देऊ शकतो. अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे भारत गोगावले म्हणाले आहेत. ( Bharat Gogavale birthday wish to Udhav Thackrey but says do not fear Thackrey but lift )

Shruti Marathe ची दिलखेचक अदा…

पुढे त्यांना उद्धव ठाकरे म्हणाल्या प्रमाणे की, शिंदे गट भेटायला घाबरतो. त्यावर गोगावले म्हणाले असं काही नाही. आम्ही तेव्हाही सांगितलं होतं. बाळासाहेबांच्या मातोश्रीवर जाण्यात आम्हाला काही अडचण नाही. पण उद्धव ठाकरेंनी जी आठ मजल्यांची मातोश्री बांधली आहे. त्यावर जायला आम्हाला अडचण आहे. आम्ही आठ मजले चढू शकत नाही.

Sanskruti Balgude : संस्कृतीचा लाल ऑफ शोल्डर ड्रेसमधला हॉट अंदाज

तिसऱ्या मजल्यापर्यंत चढत होतो आम्ही तर तिथे लिफ्ट आहे. त्याने तुम्ही जाऊ शकता असं म्हटल्यावर गोगावले म्हणाले लिफ्ट आहे. मात्र ती बंद पडल्याचं आमची अडचण होईल. तसेच पुढे म्हणाले उद्धव ठाकरेंच्या वडिलांचं म्हणजे बाळासाहेबांचं नाव उंचीवर नेत आहोत. त्यामुळे त्यांनी आक्षेप घेऊ नये. जर आम्ही काही बाधा आणली तर त्यांनी आक्षेप घ्यावा अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे भारत गोगावले यांनी दिली आहे.

दरम्यान शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. काही त्यांना शुभेच्छा देताना टोले देखील लागवात आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube