Eknath Shinde यांच्या बंडाळीवर ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

Eknath Shinde यांच्या बंडाळीवर ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

उस्मानाबाद : राज्यातील सत्तांतरावेळी कैलास पाटील (Kailas Patil) हे शिंदे गटासोबत होते, पण खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्या फोनमुळेच उस्मानाबाद राज्यातील सत्तांतरावेळी कैलास पाटील हे शिंदे गटासोबत होते, पण खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या फोनमुळेच कैलास पाटील हे परत आले, असा गौप्यस्फोट त्यांनी यावेळी केला.

मागील वर्षी जून महिन्यात उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाला आव्हान देत एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केली होती. त्यावेळी बंडखोर आमदारांना थेट सुरतला हलवण्यात आलं होतं. यावेळी उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील हेही त्या आमदारांसोबत होते. पण त्यांची गाडी महाराष्ट्र- गुजरात सीमेजवळ पोहचली होती, पण नंतर ते परत आले. दिशाभूल झाल्याचं लक्षात आल्यावर आपण निसटलो असा दावा आमदार कैलास पाटील यांनी त्यावेळी केला होता.

एकनाथ शिंदे आणि ४० शिवसेना आमदारांनी एवढे मोठे बंड केले याची उद्धव ठाकरे यांना माहिती कशी मिळाली नाही असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात होता. मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडाची आपल्याला कुणकुण लागली होती. तसे एसएमएसही येत होते, असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला आहे. कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरे यांची साथ सोडायची नाही, असा निर्धार आपण आणि शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी केला होता, असेही ओमराजे यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube