मराठवाड्यात बर्ड फ्लूचा वेगाने होतोय शिरकाव; पशुसंवर्धन विभाग उपचारांसाठी अ‍ॅक्शन मोडमध्ये

बर्ड फ्लू रोगाबाबत अनावश्यक भीती बाळगू नये. तसेच अफवा, गैरसमज पसरविण्यात येऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात

  • Written By: Published:
मराठवाड्यात बर्ड फ्लूचा वेगाने होतोय शिरकाव; पशुसंवर्धन विभाग उपचारांसाठी अ‍ॅक्शन मोडमध्ये

Bird flu : बर्ड फ्लूचा मराठवाड्यात शिरकाव झाला आहे. (Bird flu) मराठवाड्यातील लातूरनंतर आता नांदेड जिल्ह्यामध्ये देखील बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाला आहे. लोहा तालुक्यातील किवळा येथील मृत कुक्कुट पक्षांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन सतर्क झाले असून पशुसंवर्धन विभागाकडून उपाययोजना सूरू करण्यात आल्या आहेत. दरम्यान, नांदेडमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने नांदेडकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

लोहा तालुक्यातील किवळा येथील शेतकरी पंजाब टरके यांच्या मोकळ्या कुकुट पालन केंद्रातील कोंबड्याचे २० पिल्ले मृत आढळले होते. पशुसंवर्धन विभागा मार्फत मृत कुकुट पक्षांचे नमुने पुणे आणि भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून मृत पिल्यांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

चीनमधूनच का पसरतात जीवघेणे व्हायरस? जाणून घ्या 4 धक्कादायक कारणे

मृत कुक्कुट पक्षांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे, त्यामुळे किवळा येथील दहा किलोमीटर परिसरात अलर्ट झोन घोषित करण्यात आला आहे. दरम्यान तातडीने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून ५६५ कुकुट पशुसंवर्धन विभागाने ताब्यात घेऊन त्यांची विल्हेवाट लावण्यात आली.

आजूबाजूच्या परिसरात बर्ड फ्लूचा प्रसार होऊ नये, यासाठी किवळा येथील दहा किलो मीटर क्षेत्र अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. या परिसरात कुक्कुट पक्षांची खरेदी-विक्रीची दुकाने, अंडी, कुक्कुट मांसाची चिकन दुकाने, वाहतूक, बाजार आणि यात्रा, बंद राहणार अस स्पष्ट करण्यात आले आहे.

बर्ड फ्लू रोगाबाबत अनावश्यक भीती बाळगू नये. तसेच अफवा, गैरसमज पसरविण्यात येऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान जिल्ह्यात कुठे ही असे आढळल्यास नजीकच्या पशु वैद्यकीय रुग्णालयात संपर्क साधण्याचे आवाहन पशु संवर्धन अधिकारी राजकुमार पडिले यांनी केले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube