महाविकास आघाडीकडे किती मुख्यमंत्री? बावनकुळेंनी आकडाच सांगून टाकला

महाविकास आघाडीकडे किती मुख्यमंत्री? बावनकुळेंनी आकडाच सांगून टाकला

BJP : महाविकास आघाडीच्या नेत्यांचे कार्यकर्त्यांकडून त्यांचा भावी मुख्यमंत्री उल्लेख करत जोरदार बॅनरबाजी केली जात आहे. या जाहिरातबाजीवर भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सडकून टीका केली आहे. महाविकास आघाडीकडे 10 मुख्यमंत्री आहेत. काँग्रेसमध्ये तीन, राष्ट्रवादीत तीन तर शिवसेनेकडे दोन मुख्यमंत्री आहते, अशी खोचक टीका बावनकुळे यांनी केली आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून असे अनोखे शक्तिप्रदर्शन केले जात आहे. नेत्यांकडून मात्र या प्रकारांना कार्यकर्त्यांचा उत्साह असे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात मात्र महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी आताच काय परिस्थिती आहे याचा अंदाज येतो.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा शरद पवार करणार ‘खास पाहुणचार’ : अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त शक्तिपदर्शन

याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचेही भावी मुख्यमंत्री म्हणून बोर्ड लागत आहेत. काल तर माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांचाही भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागला होता. यावरूनच बावनकुळे यांनी या नेत्यांची फिरकी घेत महाविकास आघाडीत आजच मुख्यमंत्री पदासाठी दहा दावेदार असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, काल खासदार सुजय विखे यांनीही थोरात यांच्या बॅनरवर टीका केली होती. काल नगरमध्ये पत्रकारांनी त्यांना याबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर विखे म्हणाले, थोरात काही माझ्या पक्षातील नाही. मात्र मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत त्यांचा नंबर लागला तर त्यांना माझ्या शुभेच्छा असा खोचक टोला त्यांनी लगावला.

जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार : भाजपने व्हिडिओ करून सांगितली दहा कारणे

या नेत्यांचेही लागले होते बॅनर

थोरात यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून कार्यकर्त्यानी फलक लावला असला तरी थोरात ज्या महाविकास आघाडीत आहेत तेथे आधीच अनेक इच्छुक आहेत. कारण याआधी अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदासाठी मोठी स्पर्धा आहेत. त्यात आता बाळासाहेब थोरातांची भर पडली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube