मुख्यमंत्रीपदाबाबत विखेंच्या मनात काय?; प्रतिक्रिया देताना म्हणाले…
Radhakrishna Vikhe Patil : सध्या राज्यातील अनेक भागात अवकाळी पावासाने थैमान घातले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेली पिके आडवी झाली आहेत. त्यामुळे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे अवकाळीमुळे नुकसान झालेल्या भागाचा दौरा करत आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात अवकाळी भागाचा दौरा करण्यासाठी येत आहेत, असे देखील त्यांनी सांगितले आहे.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीवरुन देखील भाष्य केले आहे. यंदाच्या तुलनेत मागच्यावेळेस जास्त नुकसान झाले होते. तेव्हा संपूर्ण राज्य अवकाळी पावसाने ग्रासले होते. तेव्हा आमच्या सरकारने एनडीआरएफचे नियम बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत केली होती. अनेक नियम शिथिल केली होती. सरकारची मदत तातडीने देता यावी म्हणून प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे, असे विखे पाटील म्हणाले आहेत.
कोर्लई गावच्या 19 बंगले प्रकरणात माजी सरपंचाला बेड्या, रश्मी ठाकरेंच्या अडचणीत वाढ?
यावेळी त्यांनी विरोधकांना देखील सुनावले आहे. विरोधकांकडे नुकसान केल्याशिवाय दुसरे काही नाही. गेली अडीच वर्षे ते काहीही करु शकलेले नाहीत. त्यांच्याकाळातील मदत आम्ही सरकारमध्ये आल्यावर देिली आहे. त्यामुळे त्यांच्या आरोपांना उत्तर द्यावे, असे मला काही वाटत नाही. जनतेला सर्व माहित आहे की, पंचनामे सुरु आहेत. प्रशासकीय अधिकारी फिल्डवर आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या सरकारच्या तुलनेत कितीतरी पट मदत आम्ही शेतकऱ्यांना दिली आहे व पुढेही देणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर राधाकृष्ण विखे पाटील हे मुख्यमंत्री होणार अशी पोस्ट व्हायरल होते आहे. यावर देखील त्यांनी भाष्य केले आहे. ही माझी बदनामी करण्याचा प्रयत्न आहे. राज्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सक्षम नेतृत्व आहे. मला ही संधी पक्षानेच दिली आहे, असे विखे पाटील म्हणाले आहेत.