Maharashtra Politics : देशमुख-भाजपात ‘ट्विट वॉर’! कारण ठरला बावनकुळेंचा ‘तो’ सवाल

Maharashtra Politics : देशमुख-भाजपात ‘ट्विट वॉर’! कारण ठरला बावनकुळेंचा ‘तो’ सवाल

Maharashtra Politics : राज्यात निवडणुकांचे वारे जोरात वाहत आहेत. लोकसभेपाठोपाठ विधानसभेच्या निवडणुका (Maharashtra Politics) होणार आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. मतदारसंघांची चाचपणी सुरू झाली आहे. तर दुसरीकडे दबावाचे राजकारणही पाहायला मिळत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ठाण्यात कार्यकर्त्यांची मन की बात जाणून घेतली. 2024 मध्ये तुम्हाला कोण मुख्यमंत्री पाहिजे?, असं विचारल्यानंतर कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं नाव घेतलं. त्यानंतर बावनकुळेंनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेशही देऊन टाकले. मात्र, विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत बावनकुळे यांच्यावर खोचक टीका केली. त्याला भाजपनेही (BJP) जोरदार प्रत्युत्तर दिले.

Sushma Andhare : ‘तोंडं बंद कराल म्हणजे, संपवाल का? धमकी देऊ नका!’ ‘त्या’ वक्तव्यावर अंधारेंचा संताप

शरद पवार गटाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बावनकुळे यांच्यासह फडणवीसांनाही खोचक टोला लगावला होता. अहो बावनकुळे साहेब.. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्यासाठी पहिलं आमदार व्हावं लागेल. तुमच्याच पक्षाचे लोक नागपुरमध्ये निवडणुकीची वाट पाहत आहेत, अशी पोस्ट देशमुख यांनी केली होती.

या पोस्टला आता भाजपनेही देशमुखांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं आहे. अहो वसुली साहेब… तुम्हाला जनतेसमोर मतं मागायला जाताना 100 कोटींचा हिशोब तर द्यावाच लागेल. पळ काढून कुठं पळता? तुम्हाला पळता पण येणार नाही माढा सारखं. आणि हो तुमची वाट तुरुंगाच्या भिंती पण पाहत आहेत असा खोचक टोला भाजपने ट्विट करत लगावला आहे.

भारतीय जनता पार्टीच्या महाविजय अभियानांतर्गत चंद्रशेखर बावनकुळे राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा दौरा करत आहेत. बावनकुळे मंगळवारी ठाण्यात होते. येथे त्यांनी पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. तसेच आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी बावनकुळेंनी कार्यकर्त्यांना विचारलं की 2024 मध्ये तुम्हाला कोण मुख्यमंत्री हवा आहे त्यावर उपस्थित कार्यकर्त्यांनी एकमुखाने देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं. 

Nitesh Rane : ‘उद्धव ठाकरेंनीच काढली राणे साहेबांची खुर्ची’; नितेश राणेंनी ‘इतिहास’च सांगितला

दरम्यान, सध्या राजकीय पक्षांकडून निवडणुकांसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. आगामी निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात लढणार असल्याचे सत्ताधारी गटातील नेते म्हणत आहेत. त्यातच अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील अशीही चर्चा होत असते. त्यातच भाजप नेत्यांकडून काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा प्रभावीपणे मांडला जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube