काँग्रेसच्या दारात लोटांगण घालून घालून त्यांचा विकास खुंटला; बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

काँग्रेसच्या दारात लोटांगण घालून घालून त्यांचा विकास खुंटला; बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Bawankule Vs Uddhav Thackeray : काँग्रेसच्या दारात लोटांगण घालून घालून उद्धव ठाकरेंचा बौद्धिक विकास खुंटला असल्याचं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. (Bawankule) सल्लागार उद्धव ठाकरेंनी बांगलादेशाचा दौरा करावा असा टोलाही चंद्रशेखर बावनकुळेंनी यावेळी लगावला.

विधानसभेच्या तोंडावर केंद्र सरकारची महाराष्ट्रात ;रेल्वे लाईन जळगाव ते जालना मार्गाला दिली मंजुरी

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

बांगलादेशामधील सत्तापरिवर्तन आणि त्यानंतर हिंदू, बौद्ध आणि तिथल्या अल्पसंख्यांक समुदायाविरोधात सुरु असलेली हिंसा हा अत्यंत गंभीर विषय आहे. केंद्र सरकार यावर पहिल्या दिवसापासून गांभीर्याने व्यक्त होत असल्याचं बावनकुळे म्हणाले. मात्र, अर्धवटराव ठाकरे यांना या परिस्थितीतही विनोदबुद्धी सुचते. मला त्यांच्या बुध्दीची कीव करावी वाटते. त्यांच्या देशभक्तीबद्दल प्रश्न निर्माण होतात असंही बावनकुळे यावेळी म्हणाले आहेत.

सत्तेसाठी लाचार

उद्धव ठाकरे यांना कशातही राजकारण सुचते. त्यांच्या बौद्धिक क्षमतेवरच प्रश्नचिन्ह लावावं लागेल. काँग्रेसच्या दारात लोटांगण घालून घालून उद्धव ठाकरेंचा बौद्धिक विकास खुंटला असावा असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला होता. सत्तेसाठी लाचार होऊन त्यांनी याआधीच हिंदुत्वाला तिलांजली दिली. आज ते पीडित हिंदूंची थट्टा करत असल्याचंही बावनकुळे म्हणाले.

सावधान! गाडीवर फॅन्सी नंबर प्लेट्स लावणं महागणार; सरकार 28 टक्के GST आकारण्याच्या तयारीत

अघाध ज्ञान पाजळू नये

हिंदू विरोधी विचारांच्या, दहशतवादी कृत्य करणाऱ्या लोकांना सल्ला देण्यासाठी उद्धव ठाकरे हे अतिशय उत्कृष्ठ सल्लागार आहेत. हल्ली त्यांचा सल्ला हे सगळेच ऐकतात. म्हणून त्यांनी बांगलादेशाचा दौरा करावा. फेसबुक लाईव्ह करावं. बांगलादेशात प्रबोधन करावं असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला. तसंच, हिंदूंवर अत्याचार होणार नाहीत यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या शेहजाद्याला दिल्लीत जरुर लोटांगण घालावं मात्र आंतरराष्ट्रीय प्रश्नावर आपले अघाध ज्ञान (?) पाजळू नये असंही बावनकुळे म्हणाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube