Download App

Sharad Pawar यांना विठ्ठल संबोधन तात्कळ थांबवा, अन्यथा रस्त्यावर उतरू; भाजपच्या तुषार भोसलेंचा इशारा

Tushar Bhosale : राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी केल्यानंतर अजित पवार यांच्या गटाची 5 जुलैला पहिलीच सभा झाली त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत राजकारणावर जोरदार प्रहार केले. यावेळी त्यांनी पवार साहेब आमच्यासाठी विठ्ठल असून, त्यांना बडव्यांनी घेरले आहे. असं विधान केलं त्यानंतर त्यांनी शरद पवारांसाठी वापरलेल्या विठ्ठल या उपमेवर भाजप करून जोरदार विरोध करण्यात आला आहे. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. ( BJP Tushar Bhosale aggressive on called Vitthal to Sharad Pawar )

क्रांतिकारी निर्णयाच्या दिशेनं नार्वेकरांचं पाऊल; शिंदे-ठाकरेंच्या 55 आमदारांची धाकधूक वाढली

काय म्हणाले तुषार भोसले?

जगाचा मालक आणि महाराष्ट्रचं आराध्य दैवत असलेल्या निर्विकार विठ्ठालाची उपमा एखाद्या राजकीय नेत्याला देणं शोभता का? असा सवाल तुषार भोसले यांनी केला आहे. पुढे ते असं देखील म्हणाले की, शरद पवारांना विठ्ठल म्हटल्याने आता महाराष्ट्राचा अपमान होत नाही का? किमान थोडी तरी लाज बाळगा. शरद पवारांना विठ्ठल संबोधनं तात्काळ थांबवा. अन्यथा तुमच्या विरोधात आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावी लागतील. असा इशारा भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी दिला आहे.
‘राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येतील का?’ संजय राऊतांच्या तोंडीही नरमाईचे बोल..

काय म्हणाले होते छगन भुजबळ?

भुजबळ म्हणाले, पवार साहेब आमच्यासाठी विठ्ठल असून, त्यांना बडव्यांनी घेरले आहे. घेरलेल्या बडव्यांना बाजूला सारत साहेबांनी आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी याव अशी आर्त विनवणीदेखील भुजबळांनी यावेळी केली. भुजबळांच्या या वक्तव्याचा रोख जयंत पाटील यांच्याकडे असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यासोबत ४० पेक्षा जास्त आमदार आहेत. त्यांच्या प्रतिज्ञापत्रावर सह्या झाल्या आहेत. बुधवारी बैठकीला सर्व आमदार आले नाही. कारण काही विदेशात आहेत. काही आजारी आहेत तर काही वाहतूक कोंडीत अडकले आहेत, असा दावा छगन भुजबळ यांनी केला.

Tags

follow us