ब्रेकिंग : मुंबईत महापौर निवडीपूर्वी भाकरी फिरली; पवारांच्या एकमेव नगरसेवकाचा शिंदेंना पाठिंबा

BMC देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या राजकारणात एक मोठी आणि अनपेक्षित उलथापालथ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

  • Written By: Published:
ब्रेकिंग : मुंबईत महापौर निवडीपूर्वी भाकरी फिरली; पवारांच्या एकमेव नगरसेवकाचा शिंदेंना पाठिंबा

Sharad Pawar Support To Eknath Shinde For BMC : मुंबई महापालिकेच्या महापौर निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने महायुतीला पाठिंबा दिला आहे. महापालिका निवडणुकीत ठाकरेंसोबत लढलेल्या राष्ट्रवादीने आता भूमिका बदलली असल्याचे समोर आले आहे. प्रभागातील विकास आणि निधीसाठी महायुतीसोबत जात शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देत असल्याचे शरद पवारांचे एकमेव नगरसेवकाने सांगितले आहे. शिंदेंसोबतच्या चर्चेनंतर ही भूमिका बदलली असल्याचे सांगितले जात आहे.

अजितदादांना तटकरेंनी संपवलं! शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदमांचा थेट आरोप

पवारांच्या एकमेव नगरसेवकाने काय सांगितलं?

मालाडमधील प्रभाग क्रमांक ४३ मधून निवडून आलेले अजित रावराणे यांनी शिंदेंना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 11 तारखेला मुंबई महापौरपदासाठी निवड केली जाणार आहे. मात्र, त्याआधी शरद पवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने महायुतीला पाठिंबा दिल्याचे समोर आले आहे. निवडणूकीपुर्वी भाजप नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कडाडून विरोध केला होता परंतु, आता बहुमताचा आकडा वाढण्यासाठी पवारांचे एकमेव अजित रावराणे यांनी शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला आहे की कोणताही निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन दिले आहे.  पवार कुंटुंबावर मोठ संकट आलेल त्यामुळे त्यांच्या कानावर काही घालणं योग्य नाही म्हणून त्यांच्याशी बोलण झालं नाही. मात्र मी राष्ट्रवादी पक्ष सोडला नसून फक्त पाठिंबा शिंदेंच्या शिवसेनेला देणार असल्याचे रावराणे यांनी सांगितले. सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 3 तर, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा 1 नगरसेवक विजयी झाला आहे. प्रभागातील विकास आणि निधीसाठी महायुतीसोबत जात शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देत असल्याचे रावराणे यांनी बोलताना स्पष्ट केले आहे.

नवनिर्वाचितांचे सत्कारच संपले नसताना छत्रपती संभाजीनगर मनपातील १८ नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार

BMC निवडणुकीतचा निकाल काय लागला होता?

देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आणि तब्बल 25 वर्षे ठाकरेंची एकहाती सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेत भाजप युतीनं ठाकरेंची सत्ता उलथवून लावली. 89 जागा मिळवत मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. तर त्यापाठोपाठ ठाकरेंच्या शिवसेनेला 65, शिंदेंच्या शिवसेनेला 29, काँग्रेसला 24, मनसेला 6, एमआयएमला 8, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 3 तर, राष्ट्रवादी शरद पवार गटाला केवळ 1 जागा मिळाली आहे. याशिवाय समाजवादी पार्टीला 2 जागा जिंकल्या आहेत.

मुंबई महापालिकेचा अंतिम निकाल

भाजप – 89
शिवसेना ठाकरे गट – 65
शिवसेना – 29
काँग्रेस – 24
मनसे – 6
एमआयएम- 8
एनसीपी – 3
एसपी – 2
एनसीपी शप – 1
————-
एकूण- 227

follow us