डोनाल्ड ट्रम्पला आणा, पण नगर–मनमाड रस्ता पूर्ण करा! सचिन अहिरांचा सुजय विखेंना मिश्कील टोला

Sachin Ahir’s playful jibe at Sujay Vikhe सचिन अहिर यांनी नगर–मनमाड रस्त्याच्या रखडलेल्या कामावरून सुजय विखेंना मिश्कील टोला लगावला.

Sachin Ahir’s Playful Jibe At Sujay Vikhe

Bring in Donald Trump, but complete Nagar-Manmad road! Sachin Ahir’s playful jibe at Sujay Vikhe : अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासासाठी आणि राज्यावरील साडेसाती संपून राज्याची प्रगती व्हावी, यासाठी शनिशिंगणापूर येथे शनी महाराजांचे मनोभावे दर्शन घेतल्यानंतर महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी नगर–मनमाड रस्त्याच्या रखडलेल्या कामावरून रोखठोक भूमिका मांडली आहे. “डोनाल्ड ट्रम्पला आणा, पण नगर–मनमाड रस्ता पूर्ण करा,” असा मिश्कील टोला त्यांनी लगावला. तसेच धीरज परदेशी हत्या प्रकरणात पीडित कुटुंबाला नक्की न्याय मिळेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

UGC-NET च्या 3 पेपरमध्ये स्पेलिंग अन् प्रिटिंगमध्ये चुका; NTA च्या कबुलीनंतर फेरपरीक्षेची तारीख जाहीर

महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिरे यांनी शनिशिंगणापूर येथे शनी महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले. राज्याची साडेसाती संपून राज्याचा विकास आणि प्रगती व्हावी, यासाठी शनी महाराजांकडे प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले.शनिशिंगणापूरमध्ये झालेल्या विविध महत्त्वपूर्ण विकासकामांची पाहणी करून समाधान व्यक्त केल्यानंतर सचिन अहिरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना नगर–मनमाड रस्त्याच्या रखडलेल्या कामाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

मुद्दे वाढवू नका अन् मुद्दे भरकटवू नका; छ. संभाजीनगरात आंदोलनात दिपकेंसमोर DCP नवलेंचं वक्तव्य

“डोनाल्ड ट्रम्पला आणा, पण नगर–मनमाड रस्ता पूर्ण करा. रस्त्याचा विषय माझ्यासमोर आला, तर मी नक्कीच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेन. नगर–मनमाड रस्त्याच्या कामाला होत असलेल्या विलंबावरून त्यांनी मिश्कील शैलीत टिप्पणी करत हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची गरज व्यक्त केली.दरम्यान, अहिल्यानगरमधील धीरज परदेशी हत्या प्रकरणावरही सचिन अहिरे यांनी भाष्य केले. परदेशी कुटुंबाला नक्की न्याय मिळेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. धीरज परदेशी यांना नक्की न्याय मिळेल. या प्रकरणात योग्य ती कारवाई होऊन पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.”

 

follow us