UGC-NET च्या 3 पेपरमध्ये स्पेलिंग अन् प्रिटिंगमध्ये चुका; NTA च्या कबुलीनंतर फेरपरीक्षेची तारीख जाहीर
UGC-NET re-examination date announced NTA's admission UGC-NET परीक्षेत तीन विषयांची परीक्षा रद्द केल्यानंतर ती परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहे.
Spelling and printing errors in three UGC-NET papers re-examination date announced following NTA’s admission : UGC-NET परीक्षेतील इंग्रजी, कॉमर्स आणि समाजशास्त्र या तीन विषयांची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) रविवारी याबाबत माहिती देताना प्रश्नपत्रिकांमध्ये स्पेलिंग, छपाई आणि इतर स्वरूपाच्या चुका आढळल्याचे स्पष्ट केले. NTAच्या माहितीनुसार, या प्रश्नपत्रिकांमध्ये यापूर्वी विचारले गेलेले काही प्रश्न पुन्हा समाविष्ट करण्यात आले होते. अॅन्सर-की प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी या त्रुटी निदर्शनास आणून दिल्या. केवळ चुकीचे प्रश्न हटवून समस्या सोडवता येणार नसल्याने संबंधित तीन विषयांची परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
NTA च्या कबुलीनंतर फेरपरीक्षेची तारीख जाहीर…
संबंधित तीन विषयांची परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता ही परिक्षा पुढील वेळापत्रकाप्रमाणे घेण्यात येणार आहे. या फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही, असे NTAने स्पष्ट केले आहे.
मुद्दे वाढवू नका अन् मुद्दे भरकटवू नका; छ. संभाजीनगरात आंदोलनात दिपकेंसमोर DCP नवलेंचं वक्तव्य
इंग्रजी: 9 सप्टेंबर, सकाळी 9 ते दुपारी 12
कॉमर्स: 9 सप्टेंबर, दुपारी 3 ते सायंकाळी 6
समाजशास्त्र: 10 सप्टेंबर, सकाळी 9 ते दुपारी 12
विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर समितीची स्थापना
प्रश्नपत्रिकांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यानंतर NTAने एक समिती स्थापन केली होती. या समितीने प्रश्नपत्रिकांचा आढावा घेतल्यानंतर त्यामध्ये तथ्यात्मक चुका, टायपिंगच्या त्रुटी आणि भाषांतरातील चुका असल्याचे आढळून आले. काही ठिकाणी व्यक्तींची किंवा पुस्तकांची नावे चुकीच्या पद्धतीने छापण्यात आली होती. काही प्रश्नांची मांडणीही अयोग्य होती. त्याशिवाय व्याकरण आणि विरामचिन्हांशी संबंधित चुका आढळल्याचे समितीच्या तपासणीत समोर आले.याशिवाय यापूर्वी विचारण्यात आलेल्या प्रश्नांपैकी मोठ्या संख्येने प्रश्न पुन्हा प्रश्नपत्रिकेत समाविष्ट करण्यात आल्याचेही समितीला आढळले.
84 विषयांची अॅन्सर-की प्रसिद्ध
NTAने रविवारी सकाळी UGC-NETमधील एकूण 87 विषयांपैकी 84 विषयांची तात्पुरती आन्सर-की प्रसिद्ध केली. मात्र इंग्रजी, कॉमर्स आणि समाजशास्त्र या तीन विषयांची आन्सर-की प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.NTAने 22 ते 30 जूनदरम्यान UGC-NET परीक्षा आयोजित केली होती. प्रश्नपत्रिकांमधील त्रुटींच्या पार्श्वभूमीवर आता तीन विषयांची फेरपरीक्षा घेतली जाणार आहे.
NTA गेल्या काही काळापासून विविध परीक्षांशी संबंधित वादांमुळे चर्चेत आहे. याच वर्षी 3 मे रोजी झालेल्या NEET-UG परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित गोंधळानंतर 21 जून रोजी फेरपरीक्षा घेण्यात आली होती. यापूर्वी 2024 मध्येही NEET प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपांमुळे NTAवर प्रश्न उपस्थित झाले होते.