Buldhana Bus Accident : शिंदे-फडणवीसांनी थार गाडीमध्ये बसून ड्रामा केला; जलील यांच्या हल्लाबोल

Buldhana Bus Accident : शिंदे-फडणवीसांनी थार गाडीमध्ये बसून ड्रामा केला; जलील यांच्या हल्लाबोल

Samrudhdhi Highway Accident :  समृद्धी महामार्गावर बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ एका प्रवासी बसचा भीषण अपघात होऊन 26 जणांचा मृत्यू झाला आहे. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते, त्यातील 8 प्रवासी बसमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. हे 8 जण किरकोळ जखमी असून त्यांच्यावर सिंदखेडराजा येथे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातानंतर छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज्य सरकरावर निशाणा साधला आहे. ( Imtiyaj Jaleel criticise Eknath Shinde and Devendr Fadanvis )

जेव्हा या नेत्यांना समृद्धी महामार्गाचं उद्घाटन करायचं होतं तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थार गाडीमध्ये बसून मोठा मीडिया इव्हेंट ड्रामा केला होता, असा आरोप जलील यांनी केला आहे.

Accident : 26 जणांचा जीव घेणाऱ्या भागात सर्वाधिक अपघात; पिंपळखुटा हा अ‍ॅक्सिडेंट स्पॉट का बनलाय?

जलील म्हणाले की, “त्यांना समृ्द्धी हायवेचे उद्घाटन करण्याची घाई झाली होती. त्यामुळे या रोडवर कायम अपघात होत आहे. या अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात असून ही हत्या आहे. यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे जबाबदार असून आता ते फक्त सहानुभूती मिळवण्यासाठी घटनास्थळी येत आहे. यांच्या सरकारमध्ये माणसाची किंमत पाच लाख रुपये झाले असून ती देण्यासाठी हे दोन्ही नेते येत असल्याचे म्हणत जलील यांनी शिंदे-फडणवीसांवर निशाणा साधला.

तसेच या हायवेवर नागपुरपासून शिर्डीपर्यंत या हायवेवर एकही फुडप्लाझा उपलब्ध नाही. चहा पिण्यासाठी संपूर्ण हायवेवर एकही हॉटेल नाही आहे. महिलांना टॉयलेटला जाण्यासाठी कोणतीही सुविधा या हायवेवर उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही. पण यांना सरकार पडणार असल्याची भीती असल्यामुळे त्यांनी अर्धवट तयार झालेला हायवे जनतेसाठी खुला केला. देशामध्ये कोणत्याही एक्सप्रेसवेवर एवढे अपघात नाही झाले तेवढे या हायवेवर झाले आहेत असा आरोप जलील यांनी केला आहे.

Video : ‘आम्ही गाडीतून बाहेर उडी मारताच…’ अपघातातून वाचलेल्या तरूणाने सांगितली थरारक घटना

दरम्यान, या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील बुलढाणा येथे घडलेली गाडीची दुर्घटना अतिशय दु:खद आहे. ज्या व्यक्तींचा या अपघातात मृत्यु झाला त्यांच्या कुटुंबियांविषयी मी संवेदना व्यक्त करतो, असे मोदी म्हणाले. तसेच त्यांनी मृतांच्या नातेवाईकांनी 2 लाख रुपयांची मदत जारी केली असून जखमींना 50 हजार रुपयांची मदत जारी केली आहे. तसेच राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जारी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube