Chandrakant Khaire शिरसाटला निवडून आणण्यासाठी मी अडीच हजार फोन केले!

Chandrakant Khaire शिरसाटला निवडून आणण्यासाठी मी अडीच हजार फोन केले!

नांदेड : संजय शिरसाट यांना आमदारकीच्या निवडणुकीत निवडून आणण्यासाठी मी अडीच हजार फोन केले होते. लोकं म्हणत कशाला शिरसाटला निवडून द्यायचे, तो तिकडे मुंबईत पडलेला असतो. परंतु, मी लोकांची समजूत काढली. उद्धव ठाकरे सायंबानी सांगितले आहे. आपल्याला त्याला निवडून आणायचे आहे. म्हणून मी लोकांची समजूत काढली. पण मलाच त्याचा त्रास झाला, असे संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आमदार संजय शिरसाट यांच्यावर आरोप केला.

गद्दारी करत तो उद्धव ठाकरे यांना सोडून गेला. तो काय आमच्यावर गुन्हा दाखल करणार आहे. एकनाथ शिंदे त्याला मंत्री करत नसल्याने तो थयथयाट करत आहे. गोव्याला कशाला गेला होता आणि तिथे किती पैसे हरला आहे, अशी सडकून टीका माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आमदार संजय शिरसाट यांच्यावर केली.

Maharashtra Politics : अंधारेताई मर्यादा पाळा, तुमचा अधिकार काय ? ; निलेश राणेंनी सुनावलं – Letsupp

चंद्रकांत खैरे म्हणाले की, संजय शिरसाठ यांची महिलांशी बोलण्याची पद्धत किती उद्धट आहे. मुंबईत ७२ व्या मजल्यावर फ्लॅट कसा घेतला आहे. ते पैसे कोठून आले, हे आधी सांगावे. गद्दारी केलेल्या पैशांतूनचे फ्लॅट घेतला ना, एका माऊलीला पाच कोटी रुपये कशासाठी दिले ते पण सांगावे. काही दिवसांपूर्वी तो गोव्याला गेला होता. ते कशासाठी गेला होता, हे संजय शिरसाट याने जाहीर करावे. नाही तर मी सांगतो.

मला माहिती आहे. गोव्यात पत्ते खेळण्यासाठी संजय शिरसाट गेला होता. तिथे सव्वा कोटी रुपये जुगारात हरून आला आहे. त्यामुळे त्याने काय आम्हाला गुन्हा दाखल करण्याची धमकी द्यावी. संभाजीनगरच्या जनतेला तो काय आहे, हे सर्व माहिती आहे, असे देखील चंद्रकांत खैरे यावेळी म्हणाले.

(234) Sushma Andhare : सुषमा अंधारे यांची स्फोटक मुलाखत | LetsUpp Marathi – YouTube

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube