मुंबईतील मोदींच्या रोड ‘शो’मध्ये राज ठाकरे दिसणार? चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली भेट

मुंबईतील मोदींच्या रोड ‘शो’मध्ये राज ठाकरे दिसणार? चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली भेट

Chandrasekhar Bawankule Met Raj Thackeray : राज्यात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात राजकीय स्थित मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. राज ठाकरे यांनी 2019 ला मोदींविरोधात प्रचार केला असला तरी यावेळी मात्र त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यानंतर त्यांनी कोकणात, पुण्यात महायुतीसाठी सभाही घेतल्या. आता येत्या 17 मे रोजी पंतप्रधान नरेंद्रर मोदींचा मुंबईत रोड’शो आहे. त्या रोड’शो साठी राज ठाकरे यांना भाजपकडून निमंत्रण देण्यात आलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी राज ठाकरेंची आज भेट घेतली.

 

राज ठाकरे मोदींसोबत रोड शो’ला असणार

राज्यात लोकसभेचा चौथा टप्पा नुकताच पार पडला. आता 20 तारखेला पाचवा टप्पा होत आहे. त्यासाठी जोरदार प्रचार सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांचा सभा, रोड शो, बैठकांचा धडाका सुरूये. या पाचव्या टप्प्यात मुंबईचाही समावेश आहे. मुंबईतील मराठी मते वळविण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सुरु केले आहेत. आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्यामुळे मराठी मत वळतील अशा भावनेने भाजपने राज यांना रोड शो आणि पुढील सभांसाठी आमंत्रण दिलं आहे. आता राज ठाकरे मोदींसोबत रोड शो सभांसाठी येतात का? हे पाहण महत्वाचं आहे.

 

मराठी मतांचा टक्का वाढवण्याचे प्रयत्न

मुंबई, ठाणे, नाशिक या भागांमध्ये असणारे मनसेचे मतदार कशा पद्धतीने वळवली जातील, तसंच 17 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा शिवाजी पार्क या ठिकाणी पार पडणार आहे. या सभेसाठी देखील राज ठाकरेंना निमंत्रण देण्यात आलं आहे. शेवटच्या दिवशी देखील राज ठाकरे यांनी मुंबईत प्रचार करावा अशी विनंती केल्याचंही बावनकुळे यावेळी म्हणाले आहेत. तसंच, मुंबईतील मराठी मतांचा टक्का वाढविण्याासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत मुंबई, ठाण्यातील मराठी मतांचा टक्का कशा पद्धतीने वळवता येईल याबाबत भाजपचे प्रयत्न सुरू आहे. त्या अनुषंगाने राज ठाकरे यांच्यासोबत बावनकुळे यांनी चर्चा केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज