उद्धव ठाकरेंनी भाजपशी विश्वासघाताचं… बावनकुळेंचा घणाघात

उद्धव ठाकरेंनी भाजपशी विश्वासघाताचं… बावनकुळेंचा घणाघात

उद्धव ठाकरेंनी भाजपशी विश्वासघाताचं राजकारण केल्याने आता पुन्हा उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र दिसतील, असं वाटत नसल्याचं मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलंय. आज अहमदनगरमधील शिर्डीमध्ये बावनकुळे पत्रकार परिषदेत बोलत होते.

श्रीरामाकडे काय मागणं मागितलं ? ; शिंदेंनी सांगितलं, महाराष्ट्रात परत जाणार पण..

यावेळी बावनकुळे म्हणाले, भाजपमध्ये विश्वासघाताच्या राजकारणाला थारा नसून कोणी व्यक्तिगत टीका करीत असेल तर कोणीही हात आणि तोंड बांधून ठेवलेले नाहीत. व्यक्तिगत टीका ना तुमच्यासाठी चांगली ना आमच्यासाठी चांगली असल्याचा सज्जड इशाराच पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी बावनकुळेंनी दिला आहे.

वैयक्तिक स्वार्थासाठी हुकूमशहा सत्तेचे गुणगान, अलका लांबा यांचा पवारांवर हल्लाबोल

तसेच बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या हिंदुत्वापासून सध्या उद्धव ठाकरे दूर गेले आहेत. हे अयोध्येच्या साधुसंतांसह महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेचा आरोप आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा ठाकरे-फडणवीस एकत्र येतील, असं वाटत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

देशभरामध्ये भितीचे व दडपशाहीचे वातावरण; खडसेंचा सरकारवर हल्लाबोल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अयोध्यावारीवरुन विरोधक टीका करीत आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं असून आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे अनेकदा प्रभू रामाच्या दर्शनाला जाऊन आले आहेत.

Ghar Banduk Biryani : ‘घर बंदूक बिरयानी’चा धिंगाणा, नागराजचा हलगीवर आकाश-सायलीने धरला ठेका

अयोध्येला जाण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. प्रभू राम आपले आराध्यदैवत आहेत त्यामुळे दौऱ्याला कोणीही विरोध करु नये, नाना पटोलेंनीही अयोध्या वारी करणार असल्याचं जाहीर केलं होतं त्यावेळीही विरोधकांनी अशी टीका करावी, असं सडेतोड प्रत्युत्तर संजय राऊतांच्या टीकेला बावनकुळेंनी दिलं आहे.

दरम्यान, अयोध्या हे आराध्यदैवत असून सर्वांनीच गेलं पाहिजे, आम्ही गेलो म्हणून आमच्यावर टीका करु नये, असंही ते म्हणाले आहेत. तसेच शिंदे-फडणवीस सरकारने एक वर्षांच्या गारपीटीची मदत दुपटीने केली असून तत्कालीन सरकारच्या काळतली शेतकऱ्यांची मदतही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असल्याचं त्यांनी सांगितलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube