दंगेखोरांना झटका ! दंगलीतील नुकसान वसूल करणार; पोलिसांच्या हालचाली

दंगेखोरांना झटका ! दंगलीतील नुकसान वसूल करणार; पोलिसांच्या हालचाली

Chatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा भागात झालेल्या दंगली (Chatrapati Sambhaji Nagar Riots) प्रकरणी पोलिसांकडून दंगेखोरांची धरपकड सुरू आहे. त्यानंतर आता या दंगेखोरांना पोलीस आणखी एक झटका देणार आहेत. या दंगलीत दगडफेक आणि जाळपोळीत झालेले नुकसान दंगेखोरांकडून भरपाई करण्याचा कायदा आहे. त्यानुसार पोलीस अहवाल तयार करत असल्याची माहिती आहे.

हा अहवाल न्यायालयात सादर केला जाईल. त्यानंतर गुन्ह्याच्या निकालावेळी न्यायालयाच्या शिक्षेत नुकसान भरपाईबाबत आदेश होतील असा विश्वास पोलिसांना आहे. या दंगलीत जवळपास दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

छत्रपती संभाजीनगर दंगल प्रकरणी एसआयटीची स्थापना…

छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागात 29 मार्च रोजी मध्यरात्री दोन गटात तुफान वाद झाले. नंतर दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. हिंसक झालेल्या जमावाने पोलिसांचीच 14 वाहने जाळून टाकली. पथदिवे आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही तोडफोड केली. त्यानंतर पोलिसांनीही या दंगेखोरांची धरपकड करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत दहा पेक्षा जास्त दंगेखोरांची ओळख पटवण्यात यश मिळाले आहे. मात्र पोलिसांनी आता या दंगेखोरांना आणखी एक दणका देण्याची तयारी सुरू केली आहे.

दंगलीत झालेले नुकसान दंगेखोरांकडूनच वसूल करण्याचा कायदा आहे. त्यानुसार कारवाई करण्याच्या विचारात पोलीस प्रशासन आहे. पोलिसांनी अहवाल तयार करण्याचे काम सुरू केले आहे. पोलिसांच्या या प्रयत्नांना न्यायालयातून यश मिळाले तर दंगेखोरांना चांगलाच धडा मिळेल.

प्रकाश महाजनांनी ठाकरेंच्या ‘मातोश्री’चे बिंग फोडले…

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या दंगलीप्रकरणी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. राम नवमीच्या दिवशी संभाजीनगरमधील किराडपुरा भागात दोन गटांत तुफान हाणामारी झाली. या हाणामारीचे दगडफेकीत रूपांतर झालं होतं. त्यानंतर दगडफेक आणि पोलिसांच्या गाड्या जाळण्यात आल्याचा प्रकार घडला. दरम्यान, या प्रकरणी चारशे ते पाचशे जणांवर पोलिसांनी गुन्हे नोंद केले.

या दंगलीच्या घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. दोन्ही गटांतील नेते त्वेषाने एकमेकांवर आरोप करत आहेत. खासदार संजय राऊत यांनीही काल सरकारवर कठोर शब्दांत टीका केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube