Chembur Accident : मुंबईत मोठी दुर्घटना; शाळेच्या बसवर झाड कोसळलं, 10 विद्यार्थी गंभीर जखमी

Chembur Accident : मुंबईतली चेंबूर परिसरातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. चेंबूर येथील 11 नंबर रोडवर धावत्या शाळेच्या बसवर

Chembur Accident

Chembur Accident : मुंबईतली चेंबूर परिसरातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. चेंबूर येथील 11 नंबर रोडवर धावत्या शाळेच्या बसवर झाड कोसळलं आहे. बसवर जेव्हा झाड कोसळलं तेव्हा बसमध्ये अनेक शाळकरी मुले होती. माहितीनुसार, झाड कोसळल्याने बसचा वरचा भाग पूर्णपणे चेपला गेला आहे. बसमधील 10 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहे.

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 10 जखमी मुलांना बाहेर काढण्यात यश आले असून एक मुलगा बसमध्येच अडकला आहे. त्याला सुखरुप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. घटननेची माहिती मिळताच मुंबई महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दल आणि स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून मुलांना बसमधून बाहेर काढण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न सुरु आहे. जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरु आहे.

‘युनिव्हर्सल स्कूल’ च्या बसवर झाड कोसळलं

आज दुपारी 2:50 च्या सुमारास मुंबईतील चेंबूर येथील रोड क्रमांक 11 वर ‘युनिव्हर्सल स्कूल’च्या बसवर अचानक झाड कोसळल्याने अपघात झाला. या घटनेनंतर लगेचच बसमधील सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघाताच्या वेळी बसमध्ये 13 विद्यार्थी होते. या घटनेत जखमी झालेल्या चार विद्यार्थ्यांवर सध्या चेंबूरमधील ‘झेन हॉस्पिटल’मध्ये उपचार सुरू आहेत. अपघातानंतर पोलीस, अग्निशमन दल आणि इतर मदत व बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. या घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

अन्न व औषध प्रशासनाची पुणे विभागात धडक कारवाई; 13.71 लाखांचा मुद्देमाल जप्त

follow us