छत्रपती शिवरायांचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रपट येणार, राज ठाकरेंनी सांगितलं…

छत्रपती शिवरायांचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रपट येणार, राज ठाकरेंनी सांगितलं…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रदर्शित करणार असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. एका वृत्तवाहिनीशी मुलाखतीत राज ठाकरे बोलत होते. यावेळी विविध विषयांवर राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे.

अतिक-अशरफ हत्याप्रकरणी यूपी सरकार सर्वोच्च न्यायालयात; ‘कॅव्हेट’ म्हणजे काय?

राज ठाकरे म्हणाले, मुलाखतीदरम्यान राज ठाकरे यांना दिग्दर्शक झाल्यानंतर कोणता चित्रपट काढणार असं विचारण्यात आलं होतं. त्यावर राज ठाकरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या लिखाणाचं काम सुरु असून हा चित्रपट तीन भागांत येणार असल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.

Ahmednagar : महापालिका कर्मचाऱ्याला धक्काबुक्की, तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट आंतरराष्ट्रीय दर्जाचा असून आंतरराष्ट्रीय दर्जाचे लोकं त्यावर काम करीत आहेत.

अनेक वर्षांपासून माझी छत्रपती शिवरायांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रपट व्हावा, अशी इच्छा होती. अखेर त्यावर काम सुरु करण्यात आल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय.

Rajan Salvi : ‘प्रकल्पाला समर्थनच….’; रिफायनरी प्रकल्पाला ठाकरे गटाच्या आमदाराचा पाठिंबा

यावेळी राज ठाकरे यांनी बायोपिकवरही भाष्य केलंय. बायोपिक करायचा असेल तर इंदिरा गांधी, अमिताभ बच्चन, लता मंगेशकर यांच्यावर केला तर उत्तम राहणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं आहे. तसेच मी राजकारणा आलो नसतो तर फिल्म मेकिंगमध्ये असतो, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

शिवरायांवर येणार हा चित्रपट जागतिक दर्जाचा असणार आहे. याबाबत राज ठाकरेंची अनेक वर्षांपासून इच्छा होती, अखेर त्यावर आता काम सुरु आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांची एका वृत्तवाहिनीने नुकतीच मुलाखत घेतली. या मुलाखतीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रश्न विचारले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube