क्रीडा क्षेत्राला काही कमी पडू देणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

क्रीडा क्षेत्राला काही कमी पडू देणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे : राज्यातील क्रीडा क्षेत्राला काही कमी पडू देणार नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटलंय. पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये राज्य ऑलम्पिक स्पर्धेच उदघाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऑलम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते हा उद्धाटन सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

ते म्हणाले, कार्यक्रमाचा उत्साह येथे उपस्थित विद्यार्थ्यांनी वाढवला आहे, अन्यथा आपण भाषण करून निघून गेलो असतो. आपल्या राज्य औद्योगिक क्षेत्रासोबतच क्रीडा क्षेत्रातही अग्रेसर आहे. योग्य प्रकारे नियोजन आपण केलं, तर ऑलम्पिकमध्ये ही महाराष्ट्र पदके मिळवून देणार आहे,

शिवछत्रपतींच्या नावाच्या संकुलनामध्ये उद्घाटन होत आहे, याचा आनंद होतोय. कोरोनानंतर आता सगळ्या अडचणी दूर झाल्या असून पुन्हा एकदा दमदार सुरुवात झाली आहे. दहा हजाराहून अधिक विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. सर्वात जास्त जो जिल्हा पदके पटकावणार त्या जिल्ह्याला विजेत्याचा बहुमान मिळेल. राजकारणात आपण नगरसेवक आमदार मग मुख्यमंत्री जसे होतो. तसे टप्प्याटप्प्या जातो तसेच या खेळातील महत्त्वाचे असल्याचं ते म्हणाले.

दरम्यान, राज्य सरकारने क्रीडा क्षेत्राला प्राधान्य दिला आहे. राज्यात 155 क्रीडा संकुल आहेत. त्यात अजून 122 क्रीडा संकुल तयार करण्यात येणार आहेत. बक्षिसांच्या रकमेमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे.

क्रीडा क्षेत्राला काही कमी पडणार नाही. पूर्वी खेळाडूंना खूप त्रास करावा लागत होता. आता मात्र त्यांना अनेक सुविधा देण्यात येतील त्यांना हवी तिथे विमानाने जाण्याची सुविधा देण्यात येईल. महाविकास आघाडीने जे काही सुरू केलं होतं, त्यामध्ये भर टाकली जाईल बंद केल जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube