महाराष्ट्र केसरी विजेत्याचे विधानभवनात कौतुक; मुख्यमंत्र्यांकडून हर्षवर्धन सदगीरचा सन्मान

विधान भवनात झालेल्या या भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पैलवान हर्षवर्धन सदगीर यांच्या दमदार कामगिरीचे कौतुक केले.

  • Written By: Published:
Untitled Design 89

Chief Minister honors Harshvardhan Sadgir : 68 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा मान पटकावणारे पैलवान हर्षवर्धन सदगीर यांनी आज विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या भेटीत महाराष्ट्रातील कुस्ती परंपरेबद्दल तसेच स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबाबत चर्चा करण्यात आली. मुंबईतील विधान भवनात झालेल्या या भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पैलवान हर्षवर्धन सदगीर यांच्या दमदार कामगिरीचे कौतुक केले. 68 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उत्कृष्ट खेळ दाखवत त्यांनी हा मान पटकावला असून राज्यातील पारंपरिक कुस्तीला नवसंजीवनी देण्याचे काम पैलवान करत असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

यावेळी स्पर्धेचे प्रमुख आयोजक रामकृष्ण सातव पाटील यांच्यासह महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर पदाधिकाऱ्यांचे देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिनंदन केले. स्पर्धेचे यशस्वी आयोजन करून कुस्तीप्रेमींसाठी दर्जेदार स्पर्धा उभारल्याबद्दल आयोजकांचे देखील विशेष कौतुक करण्यात आले. या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच सभापती राम शिंदे यांची देखील पैलवान हर्षवर्धन सदगीर आणि आयोजकांनी भेट घेतली.

भोंदूबाबा खरातला सरकारी पाठबळ? मंदिर विकासासाठी 105 कोटींचा निधी; तत्कालीन मंत्री रावल यांचं मौन

या सर्व मान्यवरांनी महाराष्ट्र केसरी विजेत्याचे अभिनंदन करत पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मेघराज कटके, श्री मार्तंड देवस्थानचा अध्यक्ष मंगेश घोणे, केतन जाधव, स्वप्नील मेदनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या भेटीत महाराष्ट्रातील पारंपरिक कुस्तीचा वारसा जपण्यासाठी आणि ग्रामीण भागातील प्रतिभावान पैलवानांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन पातळीवर अधिक प्रयत्न करण्याची गरज असल्याबाबत देखील चर्चा करण्यात आली. तसेच महाराष्ट्र केसरीसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धा अधिक भव्य पद्धतीने आयोजित करण्यासाठी सरकारकडून सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली.

follow us