महंत रामगिरी महाराजांची मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली भेट, ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यांवरून संभाजीनगरमध्ये तणाव
Ramgiri Maharaj : राज्याच्या राजकारणात सध्या चर्चेचा विषय ठरलेल्या सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. नाशिक (Nashik) येथील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनाच्या दरम्यान बोलताना महंत रामगिरी महाराज यानी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने आतापर्यंत त्यांच्यावर राज्यातील अनेक शहरात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
यातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रामगिरी महाराज एकाच व्यासपीठावर दिसल्याने विरोधकांकडून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे.
महंत रामगिरी महाराज यांनी नाशिक येथील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनाच्या वादग्रस्त वक्तव्याने अहमदनगर, संभाजीनगरमध्ये महाराजांविरोधात आंदोलन करण्यात येत आहे तसेच त्यांच्या अटकेची मागणी करण्यात येत आहे. माहितीनुसार, अहमदनगर, संभाजीनगरसह राज्यातील इतर शहरात देखील रामगिरी महाराज यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकच्या सिन्नर तालुक्यात सुरू असणाऱ्या हरिनाम सप्ताहाला भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, दर दिवशी येथे लाखो भाविक येतात.आम्हाला जर एखादी सभा घ्याची असेल तर आम्हाला काय काय करावे लागते, पण इथे स्वतःहून लाखो लोक दररोज येतात. या वर्षी आषाढीला 25 लाख लोक आले होते. आज वारकरी संप्रदायाची ताकद गावागावात आहे आणि त्यांना दिशा देण्याचे काम रामगिरी महाराज करत आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, इथे देवाचा वास आहे, म्हणून इथे मोठ्या प्रमाणात लोक बसतात, इकडे कडक ऊन असून देखील मोठ्या संख्येने लोक इथे बसले आहे. आनंद दिघे हा साप्ताह कधी चुकवत नव्हते असेही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी गिरीश महाजन देखील उपस्थित होते.
‘ही बालिशबुद्धी आहे’, हॉटेल राजकारणावरून महेश लांडगेंनी लावला अमोल कोल्हेंना टोला
इम्तियाज जलील आक्रमक
तर दुसरीकडे संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलीलने (Imtiaz Jaleel) देखील या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत रामगिरी महाराज यांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन केले तसेच रामगिरी महाराजाला लवकरात लवकर अटक करा नाहीतर मुस्लिम समाज शांत बसणार नाही व त्याचे वक्तव्याची चौकशी करा हा कोणी साधुसंत नाही हा राजकारण्याची कठपुतली आहे असे जलील यांच्याकडून सांगण्यात आले.