मुख्यमंत्री शिंदेंची सिनेस्टाईलनं कारवाई, डॉक्टरांचं तात्काळ निलंबन

मुख्यमंत्री शिंदेंची सिनेस्टाईलनं कारवाई, डॉक्टरांचं तात्काळ निलंबन

ठाणे : येथील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठाता डॉ. योगेश शर्मा (Dr. Yogesh Sharma) आणि उप अधिष्ठाता डॉ. सुचितकुमार कामखेडकर (Dr. Suchitkumar Kamkhedkar)यांच्यावर ठाणे महापालिकेनं (Thane Mahapalika)निंलबनाची कारवाई (Action of suspension)केलीय. आज शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी या रुग्णालयातील नवीन प्रसूतीगृह (maternity ward), वाचनालय (library)आदींचं लोकार्पण केलं. यावेळी शिकाऊ डॉक्टरांच्या हॉस्टेलमध्ये (Hostel)सुविधा मिळत नसल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यामुळं असुविधा देणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार ही कारवाई केलीय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय मध्ये भेट दिली. यावेळी अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या कारभाराविषयी तक्रारी केल्या. नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ अॅक्शन घेत संबंधितांना निलंबित केलंय.

उदयनराजे संतापले! संजय राऊतांची काढली लाज, म्हणाले…

या डॉक्टरांना चांगल्या सोयीसुविधा पुरविण्याची जबाबदारी ही रुग्णालय प्रशासनाची असतांनाही त्याकडं दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले होते.

त्यानंतर अगदी काही वेळेतच याचा ठपका ठेवत या रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. योगेश शर्मा आणि उप अधिष्ठाता डॉ. सुचितकुमार कामखेडकर यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याची माहिती महापालिकेतून मिळतेय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube