माणसे ‘या’ लोकांना जोडे मारतील; ठाकरेंच्या त्या वक्तव्यावरुन शिंदेंनी सुनावले

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 27T184006.092

Ekanath Shinde On Uddhav Thackeray :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना ट्विट करत जोरदार उत्तर दिले आहे. याआधी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. यावरुन आता शिंदेंनी देखील त्यांना जोरदार उत्तर दिले आहे.

काहीही श्रम न करता पैसा आणि पद मिळाले की माणसांचा मेंदू काम करेनासा होतो. कष्टकरी, श्रमजीवी यांच्याविषयी त्यांच्या मनात आस्था राहत नाही. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली माणसे तळागाळातल्या लोकांना, त्यांच्या कामाला तुच्छ लेखतात. दुसऱ्यांना कायम हीन लेखण्यात, त्यांचा द्वेष करण्यात त्यांचे आयुष्य जाते. म्हणूनच त्यांना जोडे पुसणारी व्यक्ती कमी दर्जाची वाटते आणि त्यांचा ते अपमान करतात, अशा शब्दात त्यांनी ठाकरेंना सुनावले आहे.

शिंदेंचा पवारांना दुसरा धक्का! राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा तालुकाध्यक्षही गळाला

तसेच जोडे पुसणारे गरीब असतील. पण ते तुमच्यापेक्षा कदाचित जास्त प्रामाणिक असतात. कारण ते स्वतःच्या मेहनतीची भाकर खातात. ते विश्वासघातकी नसतात. चहावाला, रिक्षावाला, टपरीवाला, वॉचमन हे समाजघटक नेतृत्वही करू शकतात, हेच ज्यांच्या पचनी पडत नाही, त्यांना कायम पोटदुखी जडलेली असते, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या मारायलाही ज्यांना धड जमत नाही त्यांच्या पात्रतेबाबत काही न बोललेलेच बरे, असा टोला त्यांनी त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. तसेच केवळ कुटुंबापुरता विचार करून आणि हपापलेपणाचा चष्मा घालून वावरणारी ही माणसे आहेत. ‘धनसेवा हीच ईश्वरसेवा’ ही यांची वृत्ती आहे, असा टोलाही त्यांनी ठाकरेंना लगावला आहे.

राजकीय भूकंप! ठाकरे गटासह राष्ट्रवादीचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात

दरम्यान, आज दुपारी उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीसांवर कडाडून टीका केली होती. राज्यातील जोड बनवणारी कंपनी देखील तामिळनाडू येथे गेली आहे. जोडे पुसण्याची लायकी असलेले लोक राज्य करतायेत. महाराष्ट्राचे होणार काय? माझ्या पाठीत वार करुन सरकार पाडले. त्याचा सूड आणि बदला घेणारचं, असा घणाघात ठाकरेंनी केला होता.

Tags

follow us