शिंदेंचा पवारांना दुसरा धक्का! राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा तालुकाध्यक्षही गळाला

शिंदेंचा पवारांना दुसरा धक्का! राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा तालुकाध्यक्षही गळाला

Ram Shinde VS Rohit Pawar : कर्जत-जामखेड (Karjat-Jamkhed) विधानसभा मतदारसंघात माजी आमदार राम शिंदे आणि विद्यमान आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यात चुरस आहे. या मतदारसंघातील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही चुरस वाढल्याचे दिसून येत आहे. भाजपचे आमदार राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांना आणखी एक धक्का दिला आहे.

शिंदे-अमित शाह न झालेली भेट कुणासाठी फलदायी ? कुणाला मारक ?

राज्यात बाजार समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु असतानाच अनेक जिल्ह्यांत राजकीय नेत्यांची उलथापालथ सुरु आहे. अशातच बाजार समिती निवडणुकीसाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शहाजीराजे भोसले यांचा पाठिंबा मिळवत कर्जत-जामखेड मतदारसंघात महाविकास आघाडीला खिंडार पाडण्यात आमदार राम शिंदे यशस्वी झाले आहेत. बाजार समिती निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेल्या भाजपच्या स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलला कर्जत काँग्रेसने पाठिंबा दिला आहे.

आधी कर्जत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकिर यांना बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपच्या पॅनलमधूनच उमेदवारी जाहीर करत आमदार पवारांना धक्का दिला होता. त्यानंतर आता शहाजीराजे भोसलेंचा पाठिंबा मिळवत आमदार शिंदेंनी पवारांना दुसरा धक्का दिल्याचं मानलं जातंय. या दोन्ही धक्क्यांमुळे कर्जत-जामखेडच्या राजकारणात मोठा भूकंप झाल्याचं मानलं जातंय. कर्जत-जामखेडच्या बाजार समितीसाठी आमदार शिंदेंकडून रणनीती आखली जात असूनआता शहाजीराजे भोसलेंच्या पाठिंब्याने मतदारसंघात राम शिंदे यांची ताकद वाढली असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमधून ऐकायला मिळत आहे.

Delhi Excise Case : मनीष सिसोदियांच्या अडचणीत वाढ, कोठडीतला मुक्काम वाढला

कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरलं आहे. बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जामखेडमध्ये झालेल्या कार्यक्रमात शहाजीराजे भोसलेंनी आम्हाला फसवल्यामुळे आम्ही भाजपला जाहीरपणे पाठिंबा देत असल्याचं स्पष्ट केलं आहे.

बारसू आंदोलकांवर बळाचा वापर करु नका; अजितदादांनी सरकारला सुनावले

यावेळी बोलताना शहाजीराजे भोसले म्हणाले, मागील तीन वर्षांपासून आमदार रोहित पवारांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम केलं. आम्हाला उमेदवारी मिळाली नाही म्हणून आम्ही भाजपला पाठिंबा देत नाहीत. आम्हाला महाविकास आघाडीच्या बॅनरखाली आमदार रोहित पवारांनी फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आधी आम्हाला पाच जागा देण्याचं ठरलं होतं. त्यानंतर अचानक आम्हाला तीन जागा दिल्या गेल्या. शेवटच्या दिवशी एकही जागा काँग्रेसला दिली गेली नाही. हा आमच्यासह काँग्रेस पक्षाचा अपमान असल्याचं स्पष्ट करीत त्यांनी निवडणुकीत आम्ही भाजपचला पाठिंबा देत असल्याचं स्पष्ट केलं.

दरम्यान, उद्या 28 एप्रिल रोजी कर्जत बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडणार असून बाजार समितीसाठी भाजपकडून स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनल तर महाविकास आघाडीकडून सहकार व शेतकरी विकास आघाडी निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. कर्जत बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार शिंदेंनी महाविकास आघाडीला पराभूत करण्यासाठी आखलेली रणनीती यशस्वी होणार की नाही? हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube