बारसू आंदोलकांवर बळाचा वापर करु नका; अजितदादांनी सरकारला सुनावले

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 27T133107.396

Ajit Pawar On Barasu Refinery :  राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा प्रदान करण्यात यावा, याची मागणी केली आहे. 1 मे रोजी महाराष्ट्र दिन असतो. त्याअगोदर त्यांनी एक पत्र लिहीत सरकारला याची मागणी केली आहे. यानंतर त्यांनी विधानभवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधला.

अजित पवारांनी मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा प्रदान करण्यात यावा अशी मागणी केली आहे. सध्या राज्यात व केंद्रात एका विचाराचे सरकार आहे. त्यामुळे जर राज्य सरकारने हा प्रस्ताव केंद्राला पाठवला तर याबाबतचा निर्णय होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच राज्यात ज्याप्रकारे छत्रपती संभाजीनगर व धाराशिव या नावांचा निर्णय केंद्राच्या संमतीने झाला तसाच हा निर्णय देखील होऊ शकतो, असे अजितदादा म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री साताऱ्यातही ऑनड्युटी; एकाच दिवसांत केला 65 फाईल्सचा निपटारा

तसेच यावेळी बारसू येथे सुरु असलेल्या रिफायनरी आंदोलनावर देखील भाष्य केले  आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कधीही विकासाला विरोध नसतो. मात्र विकास करत असताना सरकारने पर्यावरणाचा देखील विचार केला पाहिजे, असे ते म्हणाले आहेत. स्थानिकांचे प्रश्न चर्चेतून सोडवायचे पाहिजेत. बारसूतील आंदोलकांवर बळाचा वापर करु नका, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

प्राजक्त तनपुरेंवर सुजय विखेंचा हल्लाबोल, ‘एकदाही कारखाना नफ्यात चालवला नाही’

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी या प्रकल्पाला पाठिंबा दिला आहे. यावर देखील ते बोलले आहेत. राज्यात सध्या बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर आहे. या प्रकल्पातून जवळपास 1 लाख रोजगार निर्माण होणार, असे बोलले जात आहे, म्हणून त्यांनी या प्रकल्पाला पाठिंबा दिला असेल. पण हे करत असताना पर्यावरणाचा देखील विचार झाला पाहिजे, अशी भूमिका अजितदादांनी मांडली आहे.

Tags

follow us