MLA cheat case : उकळलेले पैसे कुणाच्या खात्यात ठेवले? आमदारांना मंत्रिपदाची ऑफर देणाऱ्या तोतयाची कबुली

MLA cheat case :  उकळलेले पैसे कुणाच्या खात्यात ठेवले? आमदारांना मंत्रिपदाची ऑफर देणाऱ्या तोतयाची कबुली

MLA Cheat Case : राज्याच्या राजकीय वर्तुळातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार प्रलंबित असतानाच राज्यातील काही आमदारांना मंत्रिपदाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक (Fraud of Rs) करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मंत्रिपदाचे आमिष दाखवणाऱ्या व्यक्तीने आपण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (BJP National President JP Nadda) यांचे स्वीय सहायक असल्याचे सांगितले होते.

Sanjay Raut : जे.पी. नड्डांचा मुंबईशी काय संबंध? उगाच लुडबुड करु नये

मंत्रिपदाची लालूच दाखवून आमदारांकडून 1 कोटी 66 लाख रुपये उकळणाऱ्या या भामट्याचे नाव नीरजसिंग राठोड असे आहे. त्याला अटक करण्यात आली असून तो मुळचा अहमदाबादमधील आहे. मंत्रिपदाचे आमिष दाखवणाऱ्या नीरजसिंग यांने भाजपचे आमदार विकास कुंभारे, आ. टेकचंद सावरकर, आ. तानाजी मुरकुटे, आ. नारायण कुचे आणि आमदार राजेश पाडवी यांना पैशाची मागणी केली होती.

Kangana Ranaut : हिंदुत्व अन् राजकारणावर बोलणं कंगनाला भोवलं! स्वतःच सांगितला नुकसानीचा आकडा

त्यानंतर आता या प्रकरणात महत्त्वाची महिती समोर आली आहे. या तोतयाने पोलिसांकडे कबुली दिली आहे. आपल्या प्रथम तपासात त्याने सांगितले की, या आमदारांनी नीरजच्या ओळखीच्या मोबाइल विक्रेत्याच्या बँक खात्यात पैसे जमा केले. मात्र तो देत असलेली माहिती खरी आहे की खोटी हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Bullock Cart Racing : भिर्रर्र… ! बैलगाडा शर्यतीवर ‘सर्वोच्च’ निर्णय : ग्रामीण भागात आनंदाचं वातावरण

हा फसवणूक करणारा आरोपी टाईल्सच्या दुकानात काम करतो. तो तासंतान राजकीय बातम्या पाहतो. तसेच त्याने अनेक आमदारांची माहिती त्यांचे फोन नंबर गोळा केले आहेत. याशिवाय आमदारांशी तो भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या आवाजात बोलत असे. आमदार टेकचंद सावरकर यांनी सांगितले की, मला काही दिवसांपूर्वी एक फोन आला होता. आणि सांगण्यात आलं की, तुमचा मंत्रिमंडळात समावेश आहे. तेव्हा आसामधील निवडणुका सुरू होत्या. मला संबंधित व्यक्तीने सांगितलं की, आपल्या एका उमेदवारांला निवडुण आणायचं आहे. त्यासाठी तुम्ही त्याला काही मदत करा, अशा प्रकारे पैशाची मागणी केली. जेव्हा त्यांनी पैशाची मागणी केली. तेव्हा लक्षात आलं की, हे काहीतरी गडबड आहे. त्यामुळं मी नंतर मी त्याला टाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यानेही मला फोन आला नाही. त्यामुळं त्याची पोलिसात तक्रार दिली नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube