‘विखे पाटील खंडोबाचा आशिर्वाद समजा..,’; भंडारा उधळताच गोपीचंद पडकरांची पहिली प्रतिक्रिया

‘विखे पाटील खंडोबाचा आशिर्वाद समजा..,’; भंडारा उधळताच गोपीचंद पडकरांची पहिली प्रतिक्रिया

राधाकृष्ण विखे पाटलांनी खंडोबा, बिरोबा, म्हाकूबाईचा आशिर्वाद समजून भंडारा कपाळाला लावावा, अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. दरम्यान, सोलापूर दौऱ्यावर असताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर धनगर आंदोलकाने भंडारा उधळल्याची घटना घडली. त्यावर बोलताना गोपीचंद पडळकरांनी राधाकृष्ण विखेंना एक प्रकारे सल्लाच दिला आहे.

MHJ Fame Actor: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याला ‘जवान’ची भूरळ; Video Viral

गोपीचंद पडळकर म्हणाले, “मल्हारी मार्तंडाचा, बिरोबाचा, म्हाकूबाईचा ‘भंडारा हा समस्त बहुजन समाजासाठी आस्थेचं आणि श्रद्धेचं प्रतिक असून त्याचा आंदोलनासाठी वापर करणे योग्य नाही. जर काही लोकांनी तो विखे पाटलांवर उधळला असेल, तर विखे पाटलांनी तो भंडारा खंडोबाचा, बिरोबाचा, म्हाकूबाईचा आशिर्वाद समजून कपाळाला लावावा, अशी विनंती असल्याचं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.

‘माढा माणमध्ये कोणता उमेदवार नको, याचं नियोजन सुरु’; रामराजेंच्या विधानाने एकच खळबळ

नेमक काय घडलं होतं?
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना सोलापूरमध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळण्यात आल्याने खळबळ उडाली. विखे पाटलांना निवेदन देण्यात आल्यानंतर अचानक त्यांच्या अंगावर धनगर समाज कृती समितीचे अध्यक्ष शेखर बंगाळे यांनी भंडारा उधळण्यात आला. यानंतर काहीसे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

Jawan: ‘जवान’ला मिळणाऱ्या प्रतिसादाने किंग खान भारावला; ट्वीट करत म्हणाला…

बंगाळे यांच्याकडून निवेद स्विकारल्यानंतर विखे ते वाचत असताना बंगाळे यांनी त्यांच्या खिशातून एक पुडी बाहेर काढत त्यातील भंडारा विखेंच्या डोक्यावर टाकला. तसेच घोषणाबाजीदेखील केली. त्यानंतर उपस्थित भाजप कार्यकर्त्यांकडून बंगाळे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.

लिव्ह इन रिलेशनशिपचे पूर्ण स्वातंत्र्य; धमक्या मिळणाऱ्या जोडप्याला संरक्षण द्या : हायकोर्टाचे आदेश

पडळकरांचा शरद पवारांवर निशाणा :
लबाड लांडगा काकाच्या नादी लागू नका, धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठीची लढाई कायदेशीररित्या आपण सर्वोच्च न्यायालयात लढत असून त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सहकार्य आपल्याला मिळत आहे, त्यामुळे आपल्याला नक्कीच यश मिळणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, एकीकडे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला असतानाच आता धनगर आरक्षणाच्या मुद्द्यामुळे राज्य सरकारला चांगलचं कोंडीत पकडण्यात आल्याचं बोललं जात आहे, अशातच आता मराठा आरक्षणापाठोपाठ सरकार धनगर आरक्षण प्रश्नी तोडगा काढणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube