‘त्या’ दिवशी पोलिसांवर दगडफेकीचा ब्रेन ‘टोपेंचा’ होता; पवारांच्या शिलेदारावर फडणवीस प्रतिष्ठानचे आरोप
जालना : मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान, अंतरवाली सराटी येथे पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार राजेश टोपे यांनी रचला होता, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस प्रतिष्ठानचे अध्यक्ष आसाराम डोंगरे यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर टोपे यांची सीबीआय चौकशी व्हावी अशीही मागणी प्रतिष्ठानने निवेदनाद्वारे केली आहे. (conspiracy to stone-pelt the police at Antarwali Sarati was hatched by MLA Rajesh Tope of the NCP (Sharad Pawar) group.)
देवेंद्र फडवणीस प्रतिष्ठानकडून जालना पोलिस अधीक्षक शैलेश बलकावडे यांना याबाबतचे एक निवेदन देण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, आंदोलनाच्या काही दिवस आधी म्हणजे 27 ऑगस्ट रोजी आमदार टोपे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखाना इथे एक गुप्त बैठक पार झाली. यात उपोषणादरम्यान काही गडबड झाली तर पोलिसांवर थेट हल्ला करण्याचा कट रचण्यात आला.
ठाण्यात माफी, नांदेडमध्ये शिक्षा : डॉ. वाकोडेंची जात पाहून त्यांना घरी बसवलं; आव्हाडांचा हल्लाबोल
त्यादिवशी आंदोलनस्थळी काही समाजकंटक आणि जातीवादी लोक बाहेरुन आले होते. हे लोक म्हणजे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते, या समाजकंटकांनी पोलीस बांधवांवर दगडफेक केली, त्यामुळे आंदोलन चिघळले आणि नाईलाजाने पोलिसांना लाठीचार्ज, अश्रूधुरांचा मारा करावा लागला.त्यामुळेच आता आमदार राजेश टोपे, त्यांचे स्वीय सहाय्यक आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी, असेही या निवेदनात म्हंटलं आहे.
दोन ‘गुलाब’रावांची एकमेकांवर ‘काट्या’सारखी टीका; साडेचार वर्षांचा इतिहास काढत भिडले आजी-माजी मंत्री
सीबीआय चौकशीच्या मागणीवर मनोज जरांगे भडकले :
दरम्यान, सीबीआय चौकशीच्या या मागणीवर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, फडणवीसांच्या डोक्यात आता हे सुरु झालं का? दगडफेकीची चौकशी करण्याऐवजी लाठीहल्ल्यात आमच्या ज्या माता-माऊलींची डोकी फुटली, गोळ्या लागल्या त्याबाबतची चौकशी करा. तुम्ही आगोदर बोलला, माफी मागितली, आम्ही तो विषय सोडून दिला होता. तुम्ही म्हणाला होता पोलिसांना मारलं माझ्या, तुमचे पोलीस नाहीत, ही जनता आहे, असंही जरांगे यांनी पुन्हा एकदा ठणकावलं.