दोन ‘गुलाब’रावांची एकमेकांवर ‘काट्या’सारखी टीका; साडेचार वर्षांचा इतिहास काढत भिडले आजी-माजी मंत्री

दोन ‘गुलाब’रावांची एकमेकांवर ‘काट्या’सारखी टीका; साडेचार वर्षांचा इतिहास काढत भिडले आजी-माजी मंत्री

Gulabrao Patil on Gulabrao Deokar : पीक विमा काढल्यावरही विमा कंपन्या नुकसान भरपाई देत नसल्याचा आरोप शेतकरी सातत्याने करताहेत. दरम्यान, मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी याची गंभीर दखल घेतली. ते विमा कंपन्याविरोधात चांगलेच आक्रमक झालेत. शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांना माहिती देऊनही नुकसान भरपाई दिली नाही, त्यामुळं आता कंपन्यांना शिंगाडे दाखवण्याची वेळ आली, असं विधान त्यांनी केलं. त्याला गुलाबराव देवकर (Gulabrao Deokar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. यानंतर आता देवकारांच्या वक्तव्यावर पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला.

पालकमंत्री असताना चांगली कामं केली असती तर जेलमध्ये…; गुलाबराव पाटलांचे देवकरांवर टीकास्त्र 

आज गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी मंत्री असूनही शिंगाडे काढण्याची भाषा करतात, या गुलाबराव देवकर यांच्या वक्तव्याविषयी विचारले असता पाटील यांनी सांगितले की, मी देवकारांना बोललोच नाही. याला नाक खाजे आणि नकटी खिजे असं म्हणतात. हा विषय त्यांनी स्वतःच्या अंगावर घेतला. पिकविम्याच्या मदतीबाबत कृषिमंत्र्यासमोर बैठक झाली. आणि त्यांनी निर्णय घेतला की, विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. त्यानंतर कृषिमंत्र्याचा हा निर्णय विमा कंपन्यानी मान्य करावा आणि नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा विमा कंपन्यावरून शिंगाडे काढू, असं मी म्हणालो.

पाटील म्हणाले, देवकर हे सर्वात अपयशी पालकमंत्री होते. साडेचार वर्ष पालकमंत्री असताना यांनी जर चांगली कामं केली असती तर हे जेलमध्ये गेले नसते. हा माणूस पालकमंत्री राहिला, पण हातात कधी यांनी माईक घेतला नाही. सर्व डीपीडीसीच्या झालेल्या सभा ह्या एकनाथ खडसेंनी चालवल्या. मी विमा कंपन्यांना शिंगाडा दाखवण्याचा इशारा दिला होता. मात्र देवकर यांनी हा विषय स्वतःच्या अंगावर घेतला. विरोधकांचं काम आहे टीका करणे त्यामुळे ते टीका करत आहेत. मात्र आता राष्ट्रवादी आमच्या सोबत आहे. राष्ट्रवादीने राष्ट्रवादीच्या लोकांना शिंगाडे दाखवावे.

संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. राज्यातील आजचं सरकार हे एकनाथ शिंदेंनी नाही, तर ईडी-सीबीआयने आणलेलं सरकार आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. यावरही पाटील यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, संजय राऊत म्हणजे घिसी पीटी कॅसेट आहे, त्यांना आम्ही महत्व देत नाही. त्यांच्या म्हणण्याला काही किंमत नाही, असं ते म्हणाले.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आणखी आक्रमक झाले आहेत. त्यांनी सरकार हे आंदोलन चिरडून टाकेल, असं विधान केलं. याविषयी विचारले असता पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काम करत आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात लवकरच निर्णय होईल, असं पाटील म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube