पुण्यात सळई डोक्यावर पडून कामगार महिलेचा मृत्यू; क्रेनचालक,ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल

Pune News :  हडपसर येथील रामटेकडी औद्योगिक वसाहतीत लोखंडी जिना उभारणीचे काम सुरू असताना एक धक्कादायक घटना घडली आहे. या धक्कादायक

  • Written By: Published:
Pune News

Pune News :  हडपसर येथील रामटेकडी औद्योगिक वसाहतीत लोखंडी जिना उभारणीचे काम सुरू असताना एक धक्कादायक घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेत एका महिला कामगाराचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात क्रेनचालक आणि ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील रामटेकडी औद्योगिक वसाहतीत लोखंडी जिना उभारणीचे काम सुरू असताना क्रेनचा पट्टा अचानक तुटल्याने उचललेली सळई एका महिला कामगाराच्या डोक्यात पडली. त्यात महिला गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. या अपघातप्रकरणी वानवडी पोलिसांनी क्रेनचालक आणि ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वैशाली मारुती भोसले (वय 47, रा. गोसावी वस्ती, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील एका खासगी कंपनीच्या आवारात लोखंडी जिना तयार करण्याचे काम सुरू होते. 18 फेब्रुवारीला सकाळी वैशाली आणि सहकारी पिण्याचे पाणी आणण्यासाठी कंपनीच्या आवारातून निघाल्या असताना क्रेनद्वारे लोखंडी सळई उचलण्याचे काम सुरू होते.

अचानक क्रेनचा पट्टा तुटल्याने उचललेली सळई थेट वैशाली यांच्या डोक्यावर कोसळली. गंभीर जखमी झालेल्या त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करूनही उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मराठी रंगभूमीवर हास्याची नवी लाट; ‘लाडकी विहीण योजना’ घेऊन निर्मिती माहेरी परतल्या

तर दुसरीकडे वानवडी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. प्राथमिक चौकशीत क्रेनचालक आणि ठेकेदारांनी आवश्यक उपाययोजना न केल्याचे आढळले. कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच या प्रकरणात पुढील तपास सुरु असल्याची माहिती वानवडी पोलिसांनी दिली आहे.

पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये; दंड न भरल्यास लायसन्स होणार रद्द-

follow us