देवाच्या नावाने भ्रष्टाचार करणाऱ्यांना जागा दाखवणार; फडणवीसांकडून अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश

देवाच्या नावाने भ्रष्टाचार करणाऱ्यांना जागा दाखवणार; फडणवीसांकडून अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश

Crores embezzled by fake employees, officials will be investigated in Shani Shingnapur : ज्या शनी शिंगणापूरमध्ये घरे आणि दुकानांना कुलूप किंवा दरवाजे नाहीत. कारण चोरी किंवा इतर गुन्हे करणाऱ्यांना भगवान शनी शिक्षा करतात. असा गावकऱ्यांचा विश्वास विश्वास आहे. मात्र त्याच शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये दोन हजार 474 इतके बोगस कर्मचारी दाखवून, मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

आमदाराचा मार, मंत्र्याची नोटांची बॅग; एकनाथ शिंदेंचा संताप, दोन्ही संजयला सुनावले खडेबोल…

याशिवाय बनावट अॅपद्वारे भक्तांची आर्थिक लूटही करण्यात आली. या प्रकरणी तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत शुक्रवारी दिले. शनिदेवाने गैरप्रकार करणाऱ्यांना आपला प्रताप दाखवेल असं ह ते म्हणाले.

“तुम्ही फ्यूल बंद केलं का?”, अपघाताआधी पायलट्सचा अखेरचा संवाद; RUN ऐवजी इंजिन CUTOFF कसे..

नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विठ्ठल लंघे यांनी शनी शिंगणापूर देवस्थानातील गैरप्रकारांबाबत लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित केला होता. यापूर्वीही लंघे यांच्यासह चंद्रशेखर बावनकुळे यांनीही हाच प्रश्न उपस्थित केला होता. त्यानुसार चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने दिलेल्या अहवालानुसार, ईश्वराच्या ठिकाणीही लोक किती भ्रष्टाचार करू शकतात? याचा भयानक नमुना पुढे आल्याचे फडणवीस यांनी उत्तरादरम्यान सांगितले.

विमानाने टेक ऑफ करताच अचानक..; एअर इंडियाच्या विमानाचा अपघात कसा झाला, अहवालात धक्कादायक माहिती

तसेच पुढे बोलताना या देवस्थानचा कारभार पूर्वी 258 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सुरू होता. तेथे आता दोन हजार 474 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्याचे भासवण्यात आले. स्थास्थानिक कार्यकर्त्यांना बँके खाते उघडून त्यांच्या खात्यांवर देवस्थानच्या खात्यातून पगाराच्या रूपाने पैसे देण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले. त्यामुळे आता या प्रकरणी पुढील कधी होते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube