पवार साहेबांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळत राहो, सुनेत्रा पवारांची शरद पवारांवर खास पोस्ट
महाराष्ट्र विधानसभेपासून ते संसदपर्यंत त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने जनतेचा विश्वास संपादन केला आहे.
राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या राजकीय प्रवासाला आज 60 वर्षे पूर्ण झाले. गेल्या साठ वर्षांमध्ये ते विविध सभागृहाचे सदस्य राहिले आहेत. (Pawar) यामध्ये विधानसभा, लोकसभा ते राज्यसभा असा त्यांचा प्रदीर्घ प्रवास राहिलेला आहे. त्यांच्या संसदीय जीवनाला 60 पूर्ण झाल्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ट्विटरवर विशेष पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी शरद पवार यांना सदिच्छा दिल्या आहेत. यासोबतच त्यांनी शरद पवार यांच्या राजकारणातील सुरुवातीच्या काळातला एक विशेष फोटोदेखील सुनेत्रा पवार यांनी शेअर केला आहे.
काय आहे पोस्टमध्ये
आदरणीय शरद पवार साहेबांच्या सार्वजनिक व संसदीय जीवनाला आज साठ वर्षांचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण होत आहे. १९६७ मध्ये सुरू झालेला त्यांचा जनसेवेचा प्रवास आजही तितक्याच ऊर्जेने आणि निष्ठेने पुढे जात आहे. महाराष्ट्र विधानसभेपासून ते संसद भवनापर्यंत विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने जनतेचा विश्वास संपादन केला आहे”, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या आहेत.
अजित पवारांचा घातपात ? चौकशीच्या मागणीसाठी आज हे गाव बंद राहणार
या दीर्घ वाटचालीत त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहिलेले कार्यकर्ते, सहकारी आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे जनतेची साथ, हीच त्यांच्या यशाची खरी ताकद आहे. पवार साहेबांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा आगामी काळातही सर्वांना नवी ऊर्जा देत राहो, हीच सदिच्छा”, अशा शब्दांत सुनेत्रा पवार यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
सुप्रिया सुळेंनीही केली पोस्ट
आदरणीय पवार साहेब यांची संसदीय कारकीर्द आज साठाव्या वर्षांत पदार्पण करीत आहे. या सहा दशकांच्या काळात कित्येक महत्त्वाच्या घडामोडींचे ते साक्षीदार आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांनी सहा वेळा तर एकदा विधानपरिषदेचे सदस्य म्हणून शपथ घेतली. तब्बल सात वेळा ते लोकसभेत निवडून गेले तर दोन वेळा त्यांनी राज्यसभेत प्रतिनिधित्व केले आहे. सन १९६७ साली आजच्या दिवशी सुरू झालेला हा अविजीत प्रवास आजही अव्याहतपणे सुरु आहे, असं सुप्रिया सुळे आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत.
