ठाकरेंचे 20 आमदारही भाजपच्या गळाला… आदित्य ठाकरेंच्या दाव्यानंतर फडणवीसांचं प्रत्युत्तर
Devendra Fadanvis यांनी नागपूरमध्ये अदित्य ठाकरेंच्या शिंदेंचे 22 आमदार भाजपच्या गळाला लागल्याच्या विधानावर प्रत्युत्तर दिले.
Devendra Fadanvis on Aditya Thackerays statement about Shivsena MLA in contact with BJP : राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. त्या अगोदर ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी सत्ताधारी पक्षात असलेल्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांना भेटल्याने पुन्हा पक्षांतराच्या चर्चा सुरू होत्या. त्यादरम्यान ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मोठा दावा केला की, शिंदेंचे 22 आमदार भाजपच्या गळाला आहेत. त्यावर आता फडणवीस यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना फडणवीसांना आदित्य ठाकरेंच्या शिंदेंचे 22 आमदार भाजपच्या गळाला लागल्याच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, असं म्हणण्यासाठी तर उद्या कुणी असंही म्हणेल की, अदित्य ठाकरेंचे जे 20 आमदार आहेत ते ही भाजपच्या गळाला लागले आहेत. पण असं काही कुणाच्या म्हणण्याने होत नाही.
https://x.com/Dev_Fadnavis/status/1997960516929761644
तसेच आम्हाला शिंदे सेनेचे आमदार आमच्याकडे घेऊन काय करायचं? ते आमचेच आहेत. शिंदे सेना आमचा मित्रपक्ष आहे. तीखरी शिवसेना आहे. त्यामुळे आमच्या मित्रपक्षाचे आमदार आम्हाला घेऊन आम्ही अशाप्रकारचं राजकारण करत नाही. उलट शिवसेना मजबूत करण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत. तसेच भविष्या शिवसेना भाजपसह महायुती आणखी मजबूत होईल.
नेमकं काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?
राज्यामध्ये गद्दारी करून नियमबाह्य पक्ष बनला आहे. त्या पक्षाच्या आता दोन गट पडले आहेत. त्यापैकी 22 जण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गळाला लागले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरूनच हे सर्व आमदार उठतात आणि बसतात. विधानसभा निवडणुकीत देखील मुख्यमंत्र्यांनी याबाबत एक इशारा दिला होता. हा इशारा कोणाला होता? असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिमटा काढला.
‘न्यू माहिम स्कूल’ पाडू देणार नाही, मुंबई मनपा शाळेचा दर्जा सुधरवणार, राज ठाकरेंचं आश्वासन
