पुणे येथील चौगुले कुटुंबीयांचं दान! श्री साईबाबा संस्थानला विविध स्वरूपात 12 लाख 84 हजार अर्पण

Shri Saibaba Sansthan ला पुणे येथील साईभक्त उदयकुमार गोविंदराव चौगुले व त्यांच्या कुटुंबीयांनी श्री 12 लाख 84 हजार 497 रुपय देणगी अर्पण केली.

Shri Saibaba Sansthan

donation from Chougule family of Pune offered Twelve lakh eighty four Thousand rupees in various forms to Shri Saibaba Sansthan : श्री साईबाबांवरील अढळ श्रद्धा व भक्तिभावातून देश-विदेशातील साईभक्त श्री साईबाबांच्या चरणी विविध स्वरूपात देणगी अर्पण करीत असतात. याच भक्तिभावातून पुणे येथील साईभक्त उदयकुमार गोविंदराव चौगुले व त्यांच्या कुटुंबीयांनी श्री साईबाबा संस्थानला एकूण 12 लाख 84 हजार 497 रुपये मूल्याची देणगी अर्पण केली आहे. यामध्ये उदयकुमार चौगुले यांनी संस्थानला 5 लाख 44 हजार 500 रुपये किमतीचे निकॉन कंपनीचे Z6-II मॉडेलचे 24-120 एमएम लेन्ससह तीन कॅमेरा किट देणगी स्वरूपात दिले आहेत.

Maan : माणदेशच्या मातीत उलगडणार स्त्रीशक्तीचा प्रेरणादायी प्रवास ; ‘मान’च्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा!

श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येणाऱ्या भाविकांना आपल्या भेटीच्या अविस्मरणीय आठवणी छायाचित्रांच्या माध्यमातून जतन करता याव्यात, या उद्देशाने संस्थानच्या वतीने सुरू करण्यात आलेली छायाचित्र सेवा ही भाविकांसाठी उपयुक्त व भाविकाभिमुख संकल्पना असल्याची भावना चौगुले यांनी व्यक्त केली. या उपक्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन त्याला प्रोत्साहन मिळावे आणि अधिकाधिक भाविकांना या सुविधेचा लाभ घेता यावा, या हेतूने त्यांनी आधुनिक कॅमेरे देणगी स्वरूपात उपलब्ध करून दिले आहेत. भाविकांच्या सोयीसाठी राबविण्यात येणाऱ्या अशा उपक्रमांना साईभक्तांकडून मिळणारा प्रतिसाद निश्चितच प्रेरणादायी आहे.

राऊतांचे भ्रष्टाचाराचे आरोप, शिरसाटांचा मातोश्रीवर ‘टेम्पो बॉम्ब’; राजकारणात नवा धमाका, नेमकं काय घडलं?

तसेच चौगुले कुटुंबीयांनी वैद्यकीय, अन्नदान, कोठी (धूप-दीप), साई सत्यव्रत (सत्यनारायण), बांधकाम व शिक्षण अशा विविध निधींसाठी एकूण 7 लाख 39 हजार 997 रुपयांची देणगी अर्पण केली आहे.चौगुले कुटुंबीयांनी श्री साईबाबा संस्थानच्या विविध उपक्रमांना दिलेल्या या योगदानाबद्दल संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

follow us