शिक्षणमंत्री केसरकरांचं वऱ्हाड निघालंय ‘लंडन’ला

शिक्षणमंत्री केसरकरांचं वऱ्हाड निघालंय ‘लंडन’ला

मुंबई : मागील दोन वर्षात कोरोनाने जगभर हाहाकार निर्माण केला होता. या दोन वर्षात जगात प्रत्येक क्षेत्रात आमुलाग्र बदल झाले. शिक्षण क्षेत्रही या बदलाला अपवाद नसून शिक्षण क्षेत्रात देखील अनेक मोठे बदल झाले. आता याच बदलांचा अभ्यास करण्यासाठी राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) हे लंडन येथे जाणार आहेत.

वर्ल्ड इकॉनॉमिक फॉरमच्या (World Economic Forum) वतीने शिक्षण या विषयावर एक मोठी परिषद मे महिन्यात आयोजित करण्यात आली आहे. ५ ते ७ मे दरम्यान ही परिषद होणार आहे. ११० देशांचे शिक्षणमंत्री हे प्रतिनिधी म्हणून या फोरमच्या बैठकीला हजर असणार आहेत. महाराष्ट्रासाठी आनंदाची बाब म्हणजे, राज्य शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे देखील या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

Surat Session Court : राहुल गांधींचा जामीन मंजूर, आता शिक्षाही रद्द होणार?

कोरोना काळात शाळा सुरु नसल्याने ऑनलाइन शिक्षण पध्दती राज्यात रुजली. परिणामी, विद्यार्थ्यांची ग्रामीण आणि शहरी दरी अधोरेखित झाली. कोरोना काळात शिक्षण पद्धती ही ऑनलाईन असल्यानं विद्यार्थ्यांचा केवळ बौध्दीक विकास झाला, मात्र, शारिरिक विकास खुंटल्याचं चित्र आहे. दरम्यान, आता विद्यार्थ्यांचा शारीरीक, मानसिक आणि बौध्दिक असा सर्वांगिण विकास साधण्यासाठी आणि जीवनातील पुढील आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सक्षम करण्याच्या दृष्टीने वर्ल्ड इकॉनॉमिक फोरचमी परिषदे आयोजित केली आहे.

या परिषदेत राज्यात विद्यार्थ्यांची स्थिती, कोरोना काळात शिक्षण व्यवस्थेत झालेले बदल यावर केसरकर हे आपली भूमिका मांडणार आहेत. देशात सुरु करण्यात आलेले नवीन शैक्षणिक धोरण, त्याची अंलबाजावणी याविषयी देखील काही करता येईल का ? याचाही अभ्यास केसरकर करणार आहेत. केसरकर यांच्या कार्यालयाशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, याबात निमंत्रण मिळाले असून मे महिन्यात हा दौरा होईल अस सांगण्यात आले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube