Surat Session Court : राहुल गांधींचा जामीन मंजूर, आता शिक्षाही रद्द होणार?
काँग्रेस नेते राहुल गांधींना सूरत सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्यानंतर आता दोन वर्षांची शिक्षा रद्द करण्याच्या याचिकेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. शिक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर 3 मे रोजी सुनावणी पार पडणार आहे.
राहुल गांधी यांनी आज सुरत न्यायालयात दोन याचिक दाखल केल्या होत्या. त्यापैकी एक याचिका जामीनसंदर्भातील होती तर दुसरी शिक्षेला आव्हान देणारी होती. शिक्षा रद्द करण्याच्या याचिकवेर 3 मे रोजी सुनावणी होईल.
लोकसभेपूर्वी पुन्हा राज्यात राजकीय भूकंप?; काँग्रेसचा बडा नेता देणार धक्का
मोदी आडनावाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर खटला सुरु आहे. या खटल्यात राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभेच्या सचिवालयाकडून त्यांची खासदारकीही रद्द करण्यात आली आहे.
Maharashtra Politics : ‘एमआयएम बद्दल काहीही…’; उद्धव ठाकरेंना मनसेचा सवाल
या प्रकरणी राहुल गांधींनी देशभरातील काँग्रेसच्या नेत्यांसोबत सूरत न्यायालयात दोन याचिक दाखल केल्या. दोन्ही याचिकेवर सुनावणी पार पडली असून जर गांधींच्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली तरच खासदारकीबाबत निर्णय होणार आहे.
नाना पटोले यांचे विमान आले, पण नाना आलेच नाही; नाना नाराज का?
कर्नाटकात मोदी आडनावाचा वापर करत त्यांना वादग्रस्त विधान केलं होतं. वादग्रस्त विधानाप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सुरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.
दरम्यान, राहुल गांधी यांना झालेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती मिळण्याच्या याचिकेवर येत्या 13 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. आता या संपूर्ण प्रकरणानंतर राहुल गांधींची शिक्षा रद्द किंवा निर्णयाला स्थगिती मिळणार का? याबाबत अद्याप अस्पष्टताच आहे. याबाबत येत्या 13 एप्रिल आणि 3 मे रोजी होणाऱ्या सुनावणीनंतरच संपूर्ण बाबी स्पष्ट होणार आहेत.