Eknath Khadse यांनी गिरीश महाजन यांच्या थेट पिवळ्या चड्डीचा उल्लेख केला!

Eknath Khadse यांनी गिरीश महाजन यांच्या थेट पिवळ्या चड्डीचा उल्लेख केला!

मुंबई : शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल भाव ६ ते ७ हजार रुपये मिळावा म्हणून आताचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) हे दहा वर्षांपूर्वी आमरण उपोषणाला बसले होते. त्यानंतर मला सतत फोन करून गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांना बोलवून माझे उपोषण थांबवा. आता माझी चड्डी पिवळी होऊ लागली आहे, अशी गिरीश महाजन मला विनवणी करत होते. मग आता सत्तेत आल्यावर मंत्री झाल्यावर गिरीश महाजन शेतकऱ्यांचे कापूस, कांद्याचा प्रश्न का सोडवत नाही, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना विचारला आहे.

राज्य विधीमंडळात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मंगळवारी (दि. २८) रोजी विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरत आंदोलन केले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी दहा वर्षांपूर्वी घडलेल्या आंदोलनाची गिरीश महाजन यांनी आठवण करून दिली.

आधी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करा, कांदाप्रश्नी अंबादास दानवे आक्रमक

एकनाथ खडसे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दहा वर्षांपूर्वी गिरीश महाजन हे चड्डी पिवळी होईपर्यंत उपोषणाला बसले होते. शेतकऱ्यांचे प्रश्न तेव्हाही सुटले नाही. आताही तसेच आहेत. मग आता तर गिरीश महाजन हे सत्तेत आहेत. मग त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. आता का शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पळ काढत आहे. सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न गिरीश महाजन विसरले का, असा प्रश्न राज्यातील शेतकऱ्यांना पडला आहे.

दादा भुसेंची मध्यस्थी अन् लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरु

शेतकऱ्यांच्या कापसाला आणि कांद्याला चांगला बाजारभाव मिळावा म्हणून आम्ही आजच्या प्रमाणे उद्याही आवाज उठवणार आहोत. सत्ताधारी शेतकऱ्यांना विसरले असतील. पण आम्ही शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळण्यासाठी लढत राहणार आहे. सत्तेत आल्यावर गिरीश महाजन हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गप्प झाले आहेत. त्यांना आम्ही सातत्याने जागे करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube