दादा भुसेंची मध्यस्थी अन् लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरु

दादा भुसेंची मध्यस्थी अन् लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरु

नाशिक : कांद्याच्या दरात होत असलेल्या सततच्या घसरणीमुळे आज शेतकऱ्यांनी एकत्र येत आंदोलन केले होते. यावेळी महाराष्ट्र राज्य कांदा शेतकरी संघटनेच्या वतीने आक्रमक भूमिका घेत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद पाडला होता. मात्र आमदार दादा भुसे (Dada Bhuse) यांनी मध्यस्थी केली. यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतल्याने आजपासून (28 फेब्रुवारी) पुन्हा लासलगाव (Lasalgaon) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलाव प्रक्रिया सुरु झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून कांदा दरात होत असलेली घसरण यामुळे बळीराजा (Farmers Protest) चांगलाच संतापला होता. सातत्याने होणारी घसरण यामुळे बसणाऱ्या आर्थिक फटक्याला कंटाळून शेतकरी आक्रमक झाले होते. याच मुद्द्यावरून आज अधिवेशनाच्या (Budget Session) दुसऱ्या दिवशी विरोधकांकडून आंदोलन करण्यात आले.

सभागृहात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. मात्र शेतकऱ्यांचा वाढता रोष पाहता सत्ताधाऱ्यांकडून वेगाने हालचाली करण्यात आल्या. सोमवारी सकाळी लासलगावमध्ये शेतकऱ्यांनी एकत्र येत कांदा लिलाव बंद पाडले. यामुळे आज दुपारी पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेत कांद्याला हमीभाव देण्याचे आश्वासन दिले.

मोदींच्या एका ड्रेसची किंमत 10 कोटी… ठाकरे गटाच्या माजी खासदाराची टोलेबाजी

आमदार भुसे यांच्या आश्वासनानंतर मात्र शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. त्यामुळे आजपासून पुन्हा कांदा लिलाव प्रक्रिया पूर्ववत झाली आहे. सोमवारी झालेल्या आंदोलनानंतर आजपासून पूर्ववत लिलाव प्रक्रिया सुरु झाली असून सुरुवातीच्या लिलावात साडेचारशे रुपयापासून बाजार खुले झाले. कमीतकमी कमी हजार रुपये भाव मिळावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते.

मोदी शेतकऱ्यांना 6 हजार देतायत अन् 30 हजार रुपये काढून घेतायत

आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर सुरुवातीला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कांद्याचा मुद्दा उपस्थित केला. यानंतर राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी कांदा प्रश्नी सरकारला धारेवर धरले. दुसरीकडे आमदार राहुल आहेर यांनी बोलण्यास सुरुवात केल्यानंतर भुजबळ यांनी आहेर यांना थांबवत रोष व्यक्त केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube