Eknath Shinde : पंचमहाभूत लोकोत्सवातील संकल्पनांचं पालन करणं गरजेचं, अन्यथा धोका अटळ!

  • Written By: Published:
Eknath Shinde : पंचमहाभूत लोकोत्सवातील संकल्पनांचं पालन करणं गरजेचं, अन्यथा धोका अटळ!

कोल्हापूर : केवळ मानवी जीवनातच नव्हे तर संपूर्ण सृष्टीतील प्राणीमात्रासाठी पर्यावरण हा अविभाज्य घटक आहे. मात्र, दिवसेंदिवस पर्यावरणाच्या मोठ्या समस्या निर्माण होत आहेत. म्हणून पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी पंचमहाभूत लोकोत्सवाचे (Panch Mahabhuta Lokotsava)आयोजन करण्यात आले आहे. प्रदुषण कमी करायचं असेल तर या लोकोत्सवातील संकल्पनांचं पालन करायला लागेल. पर्यावरण विषय समस्या निराकरणासाठी उभी राहिलेली ही पंचमहाभूत लोकोत्सवाची लोकचळवळ राज्यव्यापी व्हावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. कणेरी श्री क्षेत्र सिद्धगिरी मठ (Siddhagiri Math) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या हस्ते सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाचे आज (दि. 20) उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पर्यावरणातील मानवाच्या हस्तक्षेपामुळं पर्यावरणाचे अतोनात नुकसान होत आहे. प्रदूषण, जंगलतोड, हवामानबदल आणि जागतिक तापमानवाढ या घटकांचा आपल्या पर्यावरणावर मोठा परिणाम होतांना दिसतो. आपल्या हव्यासापोटी पर्यावरणातील घटकांचा मानवाने अतीवापर केल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. परिणामी, भविष्यात आपल्याला गंभीर समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण गांभीर्याने पर्यावरणाचा विचारण करणं गरजेचं, अन्यथा धोका अटळ असल्याचं त्यांनी सांगितले.

शिंदे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना फायदा होईल याची संकल्पना या लोकोत्सवाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आज आपण विकासाच्या दिशेने नाही तर विनाशाकडे जात आहे. आपल्याला आपली जीवन शैली बदलावी लागेल. भारतीय संस्कृतीने नदीला माता तर पर्यावरणाला ईश्वर मानले आहे. आपल्याला या सभ्यतेला वाचवायचं असेल तर शाश्वत विकासाची अंमलबंजावणी केली पाहिजे. हे काम या लोकोत्सवाच्या माध्यमातून होत आहे. प्रदुषण कमी करायचं असेल तर या लोकोत्सवातील संकल्पनांच पालन करायला लागेल, असं ते म्हणाले.

दरम्यान, राज्यशासनही पर्यावराचा समतोल राखण्यासाठी उपाययोजना करत आहे. सरकारने पहिल्या कॅबिनेटपासून लोकहिताचे निर्णय घेतले आहेत. केंद्र सरकारचा देखील राज्य सरकारला पाठिंबा आहे. कुठल्याही प्रकल्पाला केंद्र सरकार आडकाठी आणत नाही. पर्यावरण पुरक प्रकल्पाला आम्ही प्राधान्य देतो.

नैसर्गिक शेतीमध्ये खर्च कमी आणि उत्पादन जास्त आहे. रासायनिक खतांना जशी सबसिडी दिली जाते तशी सेंद्रीय शेती आणि खतांकरीता देण्यासाठी प्रतत्न केले जातील, त्यासाठी सरकारने २५ लाख हेक्टरवर नैसर्गिक शेती करण्याचे मिशन तयार केले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

ओमराजेंना नक्की कशाचं वाईट वाटलं?

ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस जेव्हा सीएम होते, तेव्हा त्यांनी जलसंधारणाला सुरूवात केली. त्यामुळे अनेकांना फायदा झाला. मात्र, मधल्या काळात ही योजना बंद पडली. आता आमच्या सरकारच्या काळात पुन्हा ही योजना आपण सुरू करण्यात आली. वायू प्रदुषण रोखण्यासाठी शहरी भागातही अर्बन फॉरेस्टला राज्य सरकार चालना देत आहे.राज्य सरकार हे कुठलेही प्रकल्प करते, तेव्हा त्या प्रकल्पामुळे पर्यावरणाला नुकसान होणार नाही, याची काळजी घेते. समृध्दी महामार्गावर आम्ही अनेक झाडे लावली. राज्य सरकार पर्यावरण पुरक प्रकल्पालच प्राधान्य देत असल्याचं त्यांनी सांगितले.

मठाने आजवर अध्यात्याबरोबरच कृषी, पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन, अशा अनेक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. आज पर्यावरण हाणीच्या अनेक घटना आपण पाहतो. त्सुनामी, अतिवृष्टी, भूकंप, महापूर यासारख्या घटनांना आज तोंड द्यावे लागते आहे. आज आपण अशा उंबरठ्यावर उभे आहोत की, आज जर आपण निसर्गाचा सर्वार्थाने विचार केला नाही तर येणाऱ्या काळात जगाला गंभीर पर्यावरणीय समस्याला सामोरे जावे लागू शकते.

पूज्यश्री काडसिध्देश्वर स्वामीच्या संकल्पनेनुसार होत असलेला सुमंगलम् हा पर्यावरणीय लोकोत्सव ही आपल्या राज्यासाठी गौरवाची बाब आहे. अध्यात्म, शास्त्र आणि नैसर्गिक तत्व यांची सांगड घालून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हा लोकोत्सव फायद्याचा ठरेल. पर्यावरण विषय समस्या निराकरणासाठी उभी राहिलेली ही पंचमहाभूत लोकोत्सवाची लोकचळवळ राज्यव्यापी व्हावी, असं ते म्हणाले.

 

 

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube