शिंदेंच्या आमदार अपात्रतेचा निर्णय लांबला; 40 आमदारांना मिळाली दोन आठवड्यांची मुदतवाढ
Eknath Shinde MLA disqualification महाराष्ट्र सत्तासंघर्षावर घटनापीठाने एका महिन्यापूर्वी निकाल दिला होता. त्यात सत्ताबदलाच्या काळात घेतलेल्या विविध निर्णयांवर कोर्टाने आपली निरीक्षणे नोंदवली होती. राज्यपालांचे(Governor)सर्व निर्णय चुकीचे असल्याचेही न्यायालयाने म्हटले होतं. त्याचवेळी न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण सभापती राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे पाठवून त्यावर लवकर निर्णय घ्यावा, असेही कोर्टाने सांगितलं. मात्र,अद्याप यावर निर्णय झाला नाही. त्यात आता विधिमंडळाकडून हा निर्णय लांबणीवर टाकत आमदारांना मुदतवाढ दिली आहे. ( Eknath Shinde MLA disqualification Assembly speaker Rahul Narvekar extend days for decision )
‘ही तर कलानगरची बार्बी’; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
शिवसेनेच्या आमदारांना आता यासाठी दोन आठवड्याचा वेळ वाढवून देण्यात आला आहे. त्यामुळे आता पावसाळी अधिवेशनानंतर आमदारांच्या अपात्रते संदर्भात पुरावे देखील सादर करावे लागणार असल्याची माहितीही मिळाली आहे. त्यामुळे आता पावसाळी अधिवेशनानंतर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय होणार हे निश्चित झालं आहे.
Swanandi Berde : स्वानंदीचा साडीतील खास अंदाज, चाहते घायाळ
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सुरूवातीला गेलेले 16 आमदारांना अपात्र ठरवण्यात यावं अशी ठाकरे गटाची याचिका विधानसबा अध्यक्षांकडे आहे. तसेच सर्वोच्च न्यायालाने देखील हा निर्णय विधानसभा अध्यक्षांवर सोपवला आहे. तो त्यांना मेमध्ये सर्वोच्च न्यायानयाने निर्णय दिल्यानंतर 90 दिवसांत म्हणजे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात घेण्याची शक्यता आहे. त्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाला नोटीस बाजावली आहे. त्याला दोन्ही गटाने पुरावे सादर करत उत्तर दिले आहे. मात्र आता त्यात शिंदे गटाने मुदत वाढवून मागितल्यानंतर आता मुदतवाढ देण्यात आली आहे.