‘उद्धवजींबद्दल तक्रार नाही पण, आश्वासन मोडलं’, माजी महापौरांचा ठाकरेंना जय महाराष्ट्र!

‘उद्धवजींबद्दल तक्रार नाही पण, आश्वासन मोडलं’, माजी महापौरांचा ठाकरेंना जय महाराष्ट्र!

Uddhav Thackeray : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. महायुती उत्साहात दिसत आहे तर महाविकास आघाडीला गळतीने ग्रासलं आहे. ठाकरे गटाला या गळतीचा सर्वाधिक फटका बसला आहे. आताही उद्धव ठाकरे यांना (Uddhav Thackeray) धक्का देणारी घडामोड छत्रपती संभाजीनगरात घडली आहे. शहराच्या राजकारणातील मोठं नाव आणि 37 वर्षे शिवसेनेत एकनिष्ठ राहिलेले माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे नेते विनायक राऊत यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवला आहे.

उद्धव ठाकरेंनी शब्द पाळला नाही

राजीनामा देताना तुपे यांनी काही गोष्टी उघड केल्या. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत माझी कोणतीही नाराजी नाही. मात्र मला प्रभागाच्या विकासाचा विचार करणेही गरजेचे आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी किशनचंद तनवाणी यांनी ठाकरे गटाची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला. तनवाणी यांच्यानंतर राजू वैद्य यांना जबाबदारी देण्यात आली. मला जिल्हाप्रमुखाचा शब्द देण्यात आला होता. मात्र तो पाळला नाही. आता मला माझ्या प्रभागाच्या विकासासाठी निर्णय घेण्याची गरज आहे. त्यामुळे मी ठाकरेंच्या पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. आता कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहोत असे तुपे यांनी सांगितले.

मुंबईकरांचा भाजपला शुभसंकेत तर ‘पत’ आणि ‘पेढी’ साठी लढणाऱ्यांना मोठा भोपळा

तुपे शिंदेच्या शिवसेनेत जाणार ?

दरम्यान तुपे आता लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. लवकरच दोन माजी आमदार देखील पक्षात प्रवेश करतील अशी माहिती पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिली. या राजकीय घडामोडींमुळे शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. लवकरच महापालिका निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या दृष्टीने विचार केला तर शिंदे गटाची ताकद सातत्याने वाढत चालली आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंना मात्र धक्क्यांवर धक्के बसत आहेत.

कोण आहेत त्र्यंबक तुपे

त्र्यंबक तुपे हे ठाकरे गटाचे महत्वाचे नेते होते. सन 1988 मध्ये त्यांनी शिवसेनेत काम करणे सुरू केले होते. त्या काळात स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा राज्यात मोठा दबदबा होता. छत्रपती संभाजीनगरातही शिवसेनेची क्रेझ होती. या काळात तुपे यांनी पक्षात चांगलं काम केलं. यामुळे त्यांना पक्षात विविध पदांवर संधी मिळत गेली. सन 2016 मध्ये त्यांना महापौरपदी संधी मिळाली. याबरोबरच त्यांनी सभागृह नेते, महापौर, सभापती, शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख म्हणून देखील काम केले. मधल्या काळात त्यांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली होती.

जरांगे मुंबईत धडकण्याआधीच मोठा निर्णय, मराठा आरक्षण उपसमितीचं अध्यक्षपद विखेंकडे

follow us
  • fb
  • instagram
  • youtube