ऐन उन्हाळ्यात ग्राहकांच्या खिशाला झळ! राज्यात वीज दरामध्ये वाढ, आजपासून नवे दर लागू
Electricity tariff increase : एकीकडे उन्हाळा आणि त्यामुळे उकाडा वाढत आहे. मात्र याच दरम्यान महावितरणच्या ग्राहकांच्या खिशाला झळ बसली आहे. कारण महावितरणकडून आजपासून (1 एप्रिल) राज्यात नवीन वीजदर ( Electricity tariff increase) लागू झाले आहेत. त्यामुळे सुमारे दहा टक्के दर वाढ होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता उन्हाळ्यामध्ये थंडावा निर्माण करणाऱ्या फॅन, कुलर, एसी आणि फ्रिज या इलेक्ट्रीक वस्तू वापरणे ग्राहकांना महागात पडणार आहे.
Loksabha election : घनश्याम शेलारांची बीआरएसची मोटार लोकसभेत धावणार ?
महावितरणच्या सर्व स्थिर ग्राहकांचा आकार वाढणार आहे. त्यातच इंधन अधिकार जोडण्यात येणार आहे. त्यामुळे वीज नियामक आयोगाच्या मार्च 2013 च्या आदेशानुसार ही वीज दर वाढ करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य विज्ञान आयोगाने मार्च 2023 मध्ये दोन वर्षांसाठी दोन टप्प्यात विस्तार वाढ मंजूर केली होती. त्या अनुषंगाने ही वीज दर वाढ होत आहे. गेल्या वर्षी यावर्षीपासून संवर्गातील ग्राहकांच्या स्थिर आकार वाढत आहे.
Student Of The Year: ‘स्टुडंट ऑफ द इयर 3’चा सिक्वेल बनवणार; निर्मात्याची मोठी घोषणा
त्यामुळे आता घरगुती संवर्गातील सिंगल फेससाठी 128 रुपये लागतील. जे अगोदर 116 रुपये लागत होते. तर थ्री फेससाठी 425 रुपये लागणार आहेत. जे अगोदर 385 रुपये लागत होते. तर व्यावसायिक ग्राहकांना 470 ऐवजी 517 रुपये तसेच सार्वजनिक पाणीपुरवठा ग्राहकांना शून्य ते वीस किलो वॅटसाठी पूर्वीच्या 117 रुपयांऐवजी 129 रुपये लागणार आहेत. तर वीस ते चाळीस किलोवॅटच्या ग्राहकांना 142 रूपयांऐवजी 156 रुपये लागणार आहेत. तर 40 किलोवॅटवरील ग्राहकांना पूर्वीच्या 176 रुपयाची 194 रुपये आकारले जाणार आहेत.
तर दुसरीकडे कृषी ग्राहकांना ज्यांनी मीटर बसवलेले नाही. त्यांना पाच हॉर्स पॉवरपर्यंत पूर्वीच्या 466 ऐवजी 563 रुपये तर लघुऔद्योगिक ग्राहकांना 20 किलोवॅटपर्यंत 530 रुपयांऐवजी 583 रुपये आकारले जाणार आहेत. तर पथदिव्यांसाठी पूर्वीच्या 129 रुपयांऐवजी 142 रुपये आकारले जाणार आहेत. तर सरकारी कार्यालये रुग्णालयांना 20 किलोवॅट पर्यंतच्या पूर्वीच्या रुपयांऐवजी आता 427 रुपये वीज दर भरावा लागणार आहे.