अचानक विमानाचा स्फोट झाला, आम्ही दादांची बॉडी स्ट्रेचरवर ठेवली अन्…, प्रत्यक्षदर्शीने सांगितला अपघाताचा थरार
Ajit Pawar Death : बारामती येथे झालेल्या एका विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आहे. आज सकाळी
Ajit Pawar Death : बारामती येथे झालेल्या एका विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आहे. आज सकाळी (28 जानेवारी) रोजी बारामती विमानतळावर येत असताना भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला. माहितीनुसार, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आयोजित जाहीर सभेसाठी अजित पवार बारामतीला जात होते. मात्र विमान लँडिंगसाठी जात असताना काही तांत्रिक कारणाने विमान क्रॅश झालं. या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झालाय.
सध्या अजित पवार यांचे पार्थिव बारामती वैद्यकीय महाविद्यालयात ठेवण्यात आले आहे. अजित पवार यांच्या निधनाची बातमी समोर येताच बारामती वैद्यकीय रुग्णालयाच्या बाहेर प्रचंड गर्दी झाली आहे. दादांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी कार्यकर्ते, नेते आणि सामान्य नागरिक जमा होत आहे. या गर्दीत काही प्रत्यक्षदर्शीही उपस्थित आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी अपघाताच्या वेळी नेमकं काय घडलं? याबाबत माहिती दिली.
प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
अगोदरच गावामध्ये जाताना विमान थोड डगमगत होतं. दोन गावांच्यामधून जाताना विमान बरंच खालून जात होतं. साधारण 30-40 फुटाच्या अंतरावर विमान हलू लागलं होतं. तिसऱ्या राऊंडला धावपट्टीवर लँडिंग करताना जागेवरच विमानाचा स्फोट झाला असं बारामती रुग्णालया बाहेर एका प्रत्यक्षदर्शी प्रमोद मदुरीकर यांनी सांगितलं.
पुढे बोलताना प्रमोद मदुरीकर म्हणाले की, अपघात होताच दादा आम्हाला ओळखू आले. लक्षात येताच दादांची बॉडी आम्ही ॲम्बूलन्समध्ये टाकली. दुसरे त्यांचे पीए होते. त्यांचाही मृतदेह गाडीत ठेवला. अपघाताची माहिती कळताच अग्रिशमन दलही लगेच पोहोचले होते. आम्ही मृतदेह उचलायला आणि अग्रिशमन दल यायला एकच वेळ झाली असं प्रमोद मदुरीकर यांनी सांगितलं.
महाराष्ट्राकरिता आजचा दिवस अतिशय कठीण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राकरिता आजचा दिवस अतिशय कठीण असा दिवस आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी ते अत्यंत महत्वपूर्ण योगदान देत होते. मी सकाळपासून सर्वांच्या संपर्कात आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि पार्थ पवारसोबत माझे बोलणं झाले अशा गोष्टीवर मन विश्वासच ठेवत नाही. हा पवार कुटुंबावर मोठा आघात आहे. या दु:खाच्या वेळी आम्ही त्यांच्यासोबत असल्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेते, माझे मित्र आणि सहकारी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना मनाला अत्यंत व्यथित करणारी आहे. मनाला चटका लावणारी आहे. मन सुन्न झाले आहे. भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
विमानात कोण कोण होते ?
1. अजित पवार
2. विदीप जाधव
3. पिंकी माळी
4. कॅप्टन सुमित कपूर
5. कॅप्टन शांभवी पाठक
राजकारणाचा पूर्ण अंदाज अन् उत्तम पद्धतीने हाताळायचं कसब; राज ठाकरेंची अजित पवारांना श्रद्धांजली
