Fadanvis आणि Parab हे कसब्याविषयी बोलत असतानाच चर्चेचा डाव `उधळला`…

  • Written By: Published:
Anil Parab Devendra Fadanvis

मुंबई : गेले काही दिवस उद्भव ठाकरे गट आणि भाजप त्यातही देवेंद्र फडणवीस यांच्यात कमालीच वितुष्ट आले आहे. शिवसेना फूट, अनिल परब यांच्या मागे ईडी सीबीआयचा सशेमीरा या सर्व बाबी पहिल्या तर हे वितुष्ट टोकाला गेलं आहे. भाजपाच्या या कारवाई विरोधात अनिल परब मुंबई ते दिल्ली असा किल्ला लढवत आहे. आज विधीमंडळाचं अधिवेशनाचा पाहिला दिवस आहे. या अधिवेशनात कामकाज संपल्यावर विधिमंडळ पोर्व्चमध्ये पत्रकार आणि अनिल परब गप्पा मारत उभे होते.

कसबा निवडणूकविषयी याच गप्पा सुरु होत्या. याच वेळी देवेंद्र फडणवीस हे समोरून जात असताना अनिल परब यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोट दाखवलं. “कसबा बद्दल याना जास्त माहिती आहे.” असं पत्रकाराना सांगितलं.

गाडीत ड्रग्स टाकल्याशिवाय मोका लावता येणार नाही; ‘त्या’ कटाचा गिरीश महाजनांनी केला धक्कादायक खुलासा

स्वतः अनिल परब यांनी देवेंद्र फडणवीस याना आवाज देत म्हटलं पत्रकार विचारताय कसबा पेठ बद्दल काय? तुम्ही अंदाज सांगा. देवेंद्र फडणवीस या विषयावर बोलत असताना “कसबा निवडणुक तशी टफ आहे” असा संवाद सुरु होता. अशात टीव्ही कॅमेरा येताच देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला सावरलं. व्हिडिओमध्ये अनिल परब शेजारी हे लक्षात येताच त्यांनी या ठिकाणाहून निघून जाण पसंत केल. दोन नेते गेले दोन वर्ष एकमेकांशी गल्ली ते दिल्ली , जिल्हा कोर्ट ते सुप्रीम कोर्ट एकमेकांच्या विरोधात शडू ठोकून उभे आहेत. तेच आज निवांतक्षणी चर्चेत रंगणार होते. पण कॅमेराने ही चर्चा उधळली गेली.

Tags

follow us